Home साहित्य ‘मी वाचलेलं पुस्तक’ : 11

‘मी वाचलेलं पुस्तक’ : 11

0

द् गाँड आँफ स्माँल थिंग्ज’.
लेखिका अरूंधती राँय यांची आई केरळीयन ख्रिश्चन होती. तर वडील रणजित राँय हे बंगाली हिंदू होते. त्यांंचे बालपण मुख्यतः केरळ आणि तामिळनाडूमध्ये गेले. त्यांनी वास्तुरचना शास्त्राची पदवी दिल्ली हून प्राप्त केली. त्यांच्या उत्तुंग अपेक्षा आणि कसोट्यांना उतरणारी ही ‘द गाँड आँफ स्माँल थिंग्ज’ अद्वितीय साहित्यकृती १९९७ मध्ये ‘मँन बुकर पुरस्कार’ आणि २००४ मध्ये ‘सिडनी पीस’ हे लक्षणीय पुरस्कार’ संपादन केले. एवढेच नव्हे तर याच साली पुस्तकाच्या उत्कृष्ट अनुवादाबद्दल अनुवादिका श्रीमती अपर्णा वेलणकर यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला.

अरूंधती यांचे सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण विषयक लेखन प्रसिध्द आहे. समाज अधिक संवेदनशील असल्याने त्या वादाच्या भोवर-यात अनेकदा सापडल्या. पण त्याच्याशी आपले परिक्षण लिहितांना काही कर्तव्य नाही.

केरळमधील आयमेनेम या गावातील एका कुटुंबातील काही पिंढ्यांच्या पडझडीची ही शोकात्मक कहाणी आहे. बुध्दी आणि भावनांना एकाचवेळी साद घालणारी एक उत्कृष्ट आणि असामान्य कादंबरी आहे. पुर्ण वेगळ्याच आणि आतापर्यंत कुणीही न वापरलेल्या अनोख्या भाषाशैलीसाठी ही कादंबरी गाजली आहे.

पहिल्या कलाकृतीतच भावभावनांच्या इतक्या विस्तीर्ण आणि गहन विश्वाला अरुंधती यांनी सहजपणे कवेत घेतले आहे. भूतकाळ आणि वर्तमानाचे चक्र सतत फिरते ठेवून विलक्षण प्रतिभा सामर्थ्यानं त्यातील ताणेबाणे, अपरिमित प्रेम, द्वेष, मत्सर, विश्वासघात, तीव्र तिरस्कार आणि अपराधीपणाचा डंख विणत विणत अतिशय गुंतागुंतीचे गहन कथन आपल्या कल्पनाशैलीच्या माध्यमातून उलगडले आहेत. यातून ठिबकणारा शोक हे आपले सारे इतके होत जाते की सारे काही समजण्यापूर्वीच जीवाला या शोकांतिकेचा चटकाच लागतो.

अशा या सुमारे ४५० पानांच्या गूढ, रहस्यमय, थरारक अद्वितीय कादंबरीची आठवी आवृत्ती २०२१ मध्ये माझ्या हाती फारच उशिरा हाती आली तरी या कलाकृतीला माझे शतशः प्रणाम !

अपर्णा वेलणकर यांच्या भाषा, अनुवाद शैलीला सलाम!

सुधाकर तोरणे

– परीक्षण : सुधाकर तोरणे. नासिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version