Home बातम्या इंगोले सर सन्मानित

इंगोले सर सन्मानित

0

परभणी जिल्ह्यातील गंगाडेड येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. एम.डी. इंगोले यांना हैदराबाद विद्यापीठ, हैदराबाद दलित, आदिवासी अभ्यास, अनुवाद केंद्र हिंदी विभाग व “नागफणी” (डेहराडून, उत्तराखंड-यूजीसी केअर लिस्टेड मासिक) यांच्या संयुक्त विद्यमाने “हिंदी साहित्य में अस्मिता मूलक विमर्श:विविध आयाम” या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत विश्वप्रसिद्ध साहित्यकार, अभिनेता, रूपनारायण सोनकर व मुख्य संपा. सपना सोनकर, कार्य. संपा. एन.प्रजापति यांच्या हस्ते “दया पवार राष्ट्रीय दलित साहित्य सम्मान” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या परिषदेत प्रा.डॉ.इंगोले यांच्या “भारतीय परिवर्तनवादी चिंतन परंपरा और हिंदी साहित्य” या संशोधन लेख ग्रंथाचे प्रो.डॉ.विष्णु सरोदे (परिषद संयोजक), प्रो.डॉ.वी.कृष्णा (डीन), विश्व प्रसिद्ध साहित्यकार डॉ. जयप्रकाश कर्दम (दिल्ली), सुप्रसिद्ध लेखक भगवानदास मोरवाल (नवी दिल्ली) सुप्रसिद्ध मराठी साहित्यकार शरणकुमार लिंबाळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

या परिषदेतील कवि सम्मेलनातही डॉ.इंगोले यांना निमंत्रित करण्यात आले होते. डॉ.दिनेश कुशवाहा (रीवाँ, मध्यप्रदेश) “सोनी टी.व्ही.फेम वाह! वाह! क्या बात है” कवी मुकेश गौतम, डॉ.मायादेवी, डॉ.जी.वी. रत्नाकर, विशाल कुमार इ.चा सहभाग होता.

यापूर्वी डॉ. इंगोले यांना छ.शाहु महाराज राष्ट्रीय पुरस्कार (लखनऊ), “यादों के झरोखे से” आत्मकथनाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार, “मराठवाड़ा के आंबेडकरी जलसाकार” या संशोधन ग्रंथाला वामनदादा कर्डक, राष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार, संत रविदास ज्ञानरत्न राज्यस्तरीय पुरस्कार,
महात्मा ज्योतीबा फुले राष्ट्रीय शिक्षक सम्मान, समता राष्ट्रीय सम्मान पुरस्कार, भारत रत्न डॉ.ए.पी.जे.अ. कलाम आंतरराष्ट्रीय पुरस्कार, हिंदी सेवा सम्मान, डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय सम्मान पुरस्कार, लेखक प्रेमचंद आंतरराष्ट्रीय साहित्य सम्मान पुरस्कार, सुमित्रानंदन पंत आंतरराष्ट्रीय साहित्य सम्मान पुरस्कार, उत्कृष्ट सहयोगी प्रा.राष्ट्रीय सम्मान पुरस्कार,
लोककलावंत राज्यस्तरीय सम्मान, महाकवी वामनदादा कर्डक समाज भूषण पुरस्कार इत्यादी. आतापर्यंत एकूण 18 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

प्रो. डॉ.इंगोले यांचे प्रकाशित साहित्य:
1. कथाकार बदीउज्जमाँ
2. हिंदी साहित्य विविध विमर्श
3. तू चाँद बनकर रह गईं
4. यादों के झरोखे से
5. आंबेडकरवादाचा भाष्यकार महाकवी वामनदादा कर्डक
6. द्वीतीय भाषा हिंदी दूरस्थ शि.स्वा.रा.ती.म. नांदेड
7. मराठवाडा के आंबेडकरी जलसाकार
8. भारतीय परिवर्तनवादी चिंतन परंपरा और हिंदी साहित्य
9. धरती आबा
(हिंदी नाटक- मराठी अनुवाद प्रकाशनाधिन) इ. ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version