Sunday, September 14, 2025
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : 33

मी वाचलेलं पुस्तक : 33

“खरं सांगायचं तर”

पुस्तकं मी जरा चोखंदळपणे पहातो, वाचतो. असेच यावेळीही मला ‘An Unsuitable Boy’ या इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवादित ‘खरं सांगायचं तर‘ हे करण जोहर यांचे पुस्तक हाती आले. इंग्रजी पुस्तकातलं फक्त एक प्रकरण मी यापूर्वी मित्राकडे वाचलं होतं. त्यामुळे या पुस्तकाची उत्सुकता मला प्रकर्षाने वाटली. इंग्रजी वृत्तपत्रात स्तंभलेखन करणारी पुनम सक्सेना सह लिहिलेल्या या आत्मचरित्राचा अनुवाद लेखन संपादन व अनेक पुस्तकांचा अनुवाद करणा-या नीता कुलकर्णी यांनी २०१७ मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या या इंग्रजी पुस्तकाचा केला आहे.

करण जोहर यांचं हे आत्मकथन वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिंदी चित्रपट दुनियेत त्यांचं नाव आघाडीवर आहे. चाळीशीच्या घरात असलेले करण जोहर यांनी चित्रपट लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांचे वडील म्हणजे ‘धर्मा’ प्राॅडक्शनचे प्रसिध्द निर्माते आणि वितरक यश जोहर ! त्यांच्या म्रुत्यूनंतर वडिलांचा वारसा आणि धर्मा प्राॅडक्शनची धुरा करण पुढे नेत आहे.

‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ या चित्रपटासाठी आदित्य चोप्रा यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करणने चित्रपट उद्योगात पदार्पण केले. ‘कुछ कुछ होता है’ हा करणने लेखन, दिग्दर्शित पहिलाच चित्रपट ब्लाॅकब्लस्टर ठरला. ‘कभी खुशी कभी गम’,’ कल हो ना हो ‘ऐ दिल है मुश्कील’, ‘दिलं तो पागल है’, ‘कभी अलविदा ना कहना’ आदि सहा चित्रपट निर्मित आणि दिग्दर्शित केले आणि ‘अग्निपथ’, ‘माय नेम इज खान” आदि २०हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. यातील त्याने स्वतः लेखन व दिग्दर्शित केलेले बरेच चित्रपट गाजले आहेत. याखेरीज ‘काॅफी वुईथ करण’ ही दुरदर्शन मालिका अनेक स्टार कलाकारांना घेऊन गाजली. ‘काॅफी’चे एपिसोड्स अन् त्याचे धीटपणे संचालन करण्याची हातोटी, हजरजबाबीपणा, नर्मविनोदी शैली त्यांच्या तल्लख बुद्धी ची चुणूक दाखवितात. ही मालिका रसिक प्रेक्षकांना बरीच आवडली.

मग या पुस्तकाचं, करणच्या आत्मकथनाचे वैशिष्ट्य काय ? तर करण कडे स्वतःचे विचार आहेत. ते स्पष्टपणे मांडण्याचा धीटपणा आहे, मोकळेपणा आहे. स्व‌‌त: कडे तो पारदर्शीपणे पाहू शकतो. आपल्या खाजगी जीवनाविषयी ही तो खुलेपणाने बोलू शकतो. हातून घडलेल्या चुका तो प्रांजळपणे कथन करतो. यश आणि अपयश याबाबतीत त्याच्या भावना बधीर झाल्या आहेत आणि नैराश्याची देखील कबुली देतो. जीवनात नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व देणा-या करणच्या जीवनविषयक काही स्वतःच्या व्याख्या आहेत.

आई वडिलांच्या प्रेमळ कोषात राहणारा एकुलता एक मुलगा ते एका यशस्वी प्राॅडक्शन हाऊसचा सर्वेसर्वा आणि दिग्दर्शक ते निर्माता यांचा उत्कंठावर्धक प्रवासाचा आढावा त्यानं खुमासदार शैलीत, अप्रतिमरीत्या उलगडलाय. बालपणापासूनची त्याची जडण घडण, त्याच्या मनातील गंड, असुरक्षितता हे सर्व सांगून तो आपले बाॅलिवूड मधले अनपेक्षित पदार्पण, निर्माण केलेली स्वतःची ओळख, आदित्य चोप्रा,शाहरूख खान, काजोल सारखे जीवाभावाचे मित्र, दिग्गज कलाकार, निर्माते दिग्दर्शकांविषयी विनम्रतेची भावना, जवळची अन् दुरावलेली नाती, चित्रपटसृष्टीतील स्पर्धक या विषयी सत्य उलगडा करून व्यक्तिगत आयुष्याविषयी अत्यंत प्रामाणिकपणे व रोखठोकपणे मतं मांडतो. याच बरोबर आपले चित्रपट कसे कसे घडवित गेलो, विशेषत: ‘कुछ कुछ होता है,’कभी खुशी कभी गम” आणि नंतरच्या काळातले ‘लंचबाॅक्स’, ‘बाॅम्बे टाॅकिज’ या सारखें सिनेमे कसे घडले, त्यासाठी केलेले प्रयोग, उचललेली धाडसी पावलं आणि कॅमेरामागच्या गोष्टी या पुस्तकातील त्यांच्या कथनातून तपशिलवार आणि मुबलकपणे मिळतात. आपल्या मतांचे स्पष्टपणे केलेलं प्रदर्शन, मैत्री, टिकलेली आणि दुरावलेली, लव्ह रिलेशनशिप आणि सेक्स बद्दलचे स्पष्ट व सडेतोड विचार, सतत बदलणारं बाॅलिवूड, चाळीशीतील अस्वस्थता आणि समारोप करतांना खरं सांगितल्यानंतरचे ‘चिंतन’ या विषयाने करणने पुस्तकाचा समारोप केला आहे.

खरं सागण्यापूर्वीचं स्वगतात तो म्हणतो “अखेर आज मला अगदी मुक्त झाल्यासारखं वाटतंय!कोणींही व्यक्ती किंवा कोणत्याही गोष्टीला मी बेधडक सामोरा जाऊ शकेन. तत्व, नैतिकता, वास्तव यांच्या चौकटीत मी स्वतः ला बंदिस्त करून टाकलेलं नाही. समाजाने आखून दिलेल्या नियमांत मी मला जखडून टाकलेलं नाही. मी ४४ वर्षांचा झालों आणि नवी आव्हानं स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. नवीन लोकांशी संवाद साधण्यासाठी सज्ज आहे. माझ्या आयुष्यातील गुंतागुंत काढून टाकण्याची माझी तयारी झाली आहे. मी आतां नवीन टप्प्यात प्रवेश करतोय. तिथला दरवाजा उघडतो आहे आणि आत पाऊल टाकणार आहे. तिथे खुप उलथापालथ असेल.खूप नाट्य असेल पण तिथंच नीरवं शांतताही असेलं आणि मी त्याचा मनसोक्त आनंद घेईन”.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा