Saturday, March 15, 2025
Homeसंस्कृतीमुंबईकर

मुंबईकर

संपुर्ण महाराष्ट्रात जसे पुणेकर प्रसिद्ध आहेत तसेच संपूर्ण जगामध्ये मुंबईकर फेमस आहे.

मुंबईकर स्पिरीट असे ज्याला म्हणतात ते दुसरे तिसरे काही नसुन संपूर्ण मुंबईकरांची जिंदादिली आहे. माणुसकीचा ओलावा इथेच पहायला मिळतो.
आत्ता मुंबईकर म्हणजे नक्की कोण?
हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर मुंबई मध्ये निवास करणारा प्रत्येक माणूस…..

यामध्ये कोणत्याही विशिष्ट जातिधर्माचे लोक नसुन संविधानात अपेक्षित असलेल्या विविधतेतून एकता  या पंक्तीत बसणारा प्रत्येक जण.
अनेक जाती धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. इथे मराठमोळी पुरणपोळी, जिलेबी, गुजराती ढोकळा, फापडा, साऊथची ईडली, डोसा, अप्पे, पंजाबची लस्सी, समोसा, बंगालचे रसगुल्ले, युपीची शेवपुरी, पाणी पुरी, आणि मुंबईचा बटाटेवडा तेव्हढ्याच आवडीने खाल्ले जातात.

मुंबईचा वडापाव

मुंबईची मुलगी हे विशेषण प्रत्येक जातीच्या मुलींना लावले जाते.
इथे ईद, होळी, दिवाळी, ख्रिसमस, बैसाखी, ओणम एकाच जल्लोषात साजरे होतात. गणेशोत्सव, नवरात्र, गोविंदा हे तर सर्व धर्मियांच्या उत्साहाला उधाण आणणारे सण झाले आहेत. अशी ही मुंबईची खरी विविधतेतील एकता.

मुंबईचा गोविंदा

तर असा मला अपेक्षित असलेला मुंबईकर एकदम जबरदस्त  आहे.
तो क्रिकेटचा दिवाना आहे. चित्रपटांचा शौकीन आहे. राजकारण तज्ञ आहे. कधी शास्त्रीय संगीतात तर कधी सुगम संगीतामध्ये रममाण होणारा, तर कधी रॉक पॉप या गाण्यांवर फिदा होणारा आहे. आशा, लता, रफी, किशोर, यांच्या गाण्यांवर थिरकणारा आहे.

मुंबईकरांचे बॉलीवुड  प्रेम तर सर्व ज्ञातच आहे.
मुंबईकर प्रत्येक येणाऱ्या संकटाला धिराने तोंड देणारा शुर लढवय्या आहे. मग ती १९९३ ची बॉम्बस्फोट मालिका असो की २६ जुलैची ढगफुटी किंवा ताज सीएसटी परिसरात झालेला बेछूट गोळीबार असो.
प्रत्येक वेळी जराही, न खचता सर्व धर्मियांची मानवी साखळी तयार करणारा अवलिया म्हणजे मुंबईकर.

एकापाठोपाठ एक असे तेरा ठिकाणी बॉम्बस्फोट  झाले. सगळे जनजीवन ठप्प झाले. परंतु अवघ्या दोनच दिवसात मुंबईकर कचेरीत हजर!, शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती असे म्हणत. यालाच म्हणतात मुंबई स्पिरीट.

देशाच्या कानाकोपऱ्यातून मनात अनेक स्वप्ने  घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला हि मुंबई कवेत घेते आणि प्रत्येकाला त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी बळ देते आणि मग त्याचे रूपांतर “मुंबईकरामध्ये” होते.
एकाच वस्ती मध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध सगळे गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. एकत्रित  सण साजरे करतात. संकटकाळी एक होतात.

मुंबईकर लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यावर जीव ओवाळून  टाकणारा तसेच अमिताभ, सलमान खान शाहरुख खान यांना गळ्यातील ताईत बनवणारा आहे .
मुंबईतील डबेवाला प्रिन्स चार्ल्सला ओवाळणी घेऊन जाणारा आहे. धकधक गर्ल माधुरीच्या प्रेमात पडणारा मुंबईकर आहे. आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स साठी जीव टाकणारा मुंबईकर आहे.

मुंबईचा डबेवाला

राजकारण, क्रिकेट आणि बॉलिवूड या विषयावर तासनतास भरभरून बोलणारा  मुंबईकरच.
सर्वात जास्त टॅक्स भरण्यात देखील याचाच पहिला नंबर. मुंबईवर जर एखादे संकट येऊ घातले तर हजारो हात प्रार्थना, दुआ, नमाज, गॉड ब्लेस, मंगल हो, वाहे गुरु, दि फतेह यासाठी एकत्र उठतात आणि आलेल्या संकटाला पळवून लावतात.

वेध शाळेने इशारा दिलेले चक्रीवादळ मुंबईच्या हद्दीत प्रवेश न करताच ऊलटपावली निघून जाते, हि मुंबई करांची पुण्याई !

आत्ता देखील संपूर्ण जगामध्ये, जे कोरोना महामारीचे संकट आले आहे, त्याला मुंबईकर धैर्याने  सामोरे जात आहे. सरकारी नियम कटाक्षाने पाळत आहे.
मागच्या वर्षी लॉककडाऊनमध्ये अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. तर अशा गरजुंना अनेकांनी मदतीचा हात  दिला.

अनेक तरुणांनी एकत्र येऊन वेगवेगळे ग्रुप  बनवले आणि लोकांना ऑक्सिजनचा औषधांचा पुरवठा केला. हॉस्पिटलमध्ये अनेकांना बेड मिळवून दिले. रक्तदान, प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
गुरुद्वारात मोफत  ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात आले.
“हम सब एक है” हे वेळोवेळी मुंबईकरांनी सिद्ध केले आहे.
तर अशा या मुंबईकर स्पिरीटला  माझे शतशः नमन.
जरा हटके जरा बच के ये है बंबंई मेरी जान……..

स्मिता लोखंडे.

– लेखन : स्मिता लोखंडे.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सुंदर लेखन केलेले आहे. हार्दिक मंगल कामना. मुंबई हमारी जान, अब कोरोना को पहुंचायेगी समशान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments