आज जागतिक रंगभुमी दिन आहे. यानिमित्ताने मुखवटा ही कविता सादर करीत आहे.
– संपादक
मुखवटा पांघरुन आम्ही
रोज जगतो खोट्याने
मुखवटा बदलुन आम्ही
रोजच वागतो खोट्याने ॥१॥
कधिच न कळले आम्हां
हा मुखवटा माझा
रंगिल्या या दुनियेत
बदलतो मुखवटा माझा ॥२॥
खोट्याचा बाजार भरतो इथे
सत्य रोज विकते मुकाट्याने
चकाट्या पिटताना आम्ही
मुखवटे रोज बदलतो मुकाट्याने ॥३॥
मुखवटे बदलणे हा आजार
जडला जरी आम्हांस
कोणी म्हणले जरी रंग बदलता
नाही तमा तरी आम्हांस ॥४॥
खर्यासह आम्ही वागतो खोटे
खोट्यासह बोलतो रोज खोटे
खरे नाही जगणे आमचे खोटे
मुखवटे बदलुन रोज वागतो खोटे ॥५॥
जीवनाच्या या रंगमंचाला
मुखवट्याचा साज नित्य नवा
द्वेष, राग, प्रेम, वासना, भावनेला
मुखवट्याचा बाज नित्य नवा ॥६॥
– रचना : पंकज काटकर. काटी, जि.उस्मानाबाद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800