राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.
१. कॉकलियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६),
२. हृदय प्रत्यारोपण
३. यकृत प्रत्यारोपण
४. किडणी प्रत्यारोपण
६. बोन मॅरो प्रत्यारोपण
५. फुफ्फुस प्रत्यारोपण
७. हाताचे प्रत्यारोपण
८. हिप रिप्लेसमेंट
९. कर्करोग शस्त्रक्रिया
१०. अपघात शस्त्रक्रिया
११. लहान बालकांच्या शस्त्रक्रिया
१२. मेंदूचे आजार
१३. हृदयरोग
१४. डायलिसिस
१५. अपघात
१६. कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन)
१७. नवजात शिशुंचे आजार
१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण
१९. बर्न रुग्ण
२०. विद्युत अपघात रुग्ण
या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.
या आजारांच्या उपचारांसाठी गरजुंनी पुढील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
१. विहीत नमुन्यात अर्ज
२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खाजगी रुग्णालय असल्यास ते सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.
(वार्षिक उत्पन्न रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
बाल रुग्णांसाठी आईचे आधारकार्ड आवश्यक
५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट.
७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी रिपोर्ट आवश्यक आहे.
८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवावी.
Email id:- aao.cmrf-mh@gov.in
अर्ज व संबधित कागद पत्रांच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र.८६५०५६७५६७
संपर्क क्र. ०२२-२२०२६९४८ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व रुग्णालयांची यादी वेबसाईटवर आहे.
आपल्याला आवश्यकता भासल्यास आपण
श्री मंगेश चिवटे,
कक्ष प्रमुख,
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई -३२
फोन – ९६१९९५१५१५/०२२:२२०२५५४० यांच्याशी संपर्क साधू शकता.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
Dibitis
Health