Home बातम्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवेंद्र भुजबळ यांना पुरस्कार

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवेंद्र भुजबळ यांना पुरस्कार

6

चौथास्तंभ पुरस्कार” हा अप्रतिम मीडिया तर्फे देण्यात येणारा विकास पत्रकारितेतील राज्यस्तरीय पुरस्कार मुंबईत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात ‘न्यूज स्टोरी टुडे’ चे संपादक देवेंद्र भुजबळ यांना आज प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यासपिठावर विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री मंदार पारकर, विशेष गौरवमूर्ती एमएसआरडीसी चे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक श्री राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव श्री नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक
श्री अभिजीत पाटील, अभिनेते श्री मंगेश देसाई, निमंत्रक श्री विवेक देशपांडे व रणजीत कक्कड उपस्थित होते.

या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जेष्ठ संपादक, पत्रकार यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक अप्रतिम मीडिया चे संचालक डॉ अनिल फळे यांनी केले तर आभार प्रदर्शन निमंत्रक श्री विवेक देशपांडे यांनी केले

कार्यक्रमाची सविस्तर बातमी उद्याच्या अंकात अवश्य वाचा.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

6 COMMENTS

  1. खूप खूप अभिनंदन 🎉🎉👏👏👏,आयुष्यभर केलेल्या कामांची प्रंशसा झाली ,अजूनही कार्यरत असलेल्या तूम्हा दोघांना त्रिवार वंदन 🥇🥇.पुढील कार्यास शुभेच्छा 😊

  2. देवेंद्रजी,
    आपल्याला मिळालेल्या या विशेष पुरस्काराबद्दल आपले मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन..
    तसेच पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
    गजेंद्र क्षीरसागर
    मुक्त पत्रकार,
    अहमदनगर जिल्हा अध्यक्ष,
    ग्राहक पंचायत महाराष्ट्र

  3. भुजबळ सर आपले मनापासून खूप खूप अभिनंदन !! 💐💐🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version