Wednesday, June 18, 2025
Homeबातम्यामेघालय चित्रपट महोत्सव येत्या १४ पासून

मेघालय चित्रपट महोत्सव येत्या १४ पासून

‘मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ चे आयोजन १४ ते १८ मार्च दरम्यान करण्यात आले आहे.

या निमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष कमांडर शांगप्लियांग, डॉ. हरजीत सिंह आनंद (इंडो युरोपियन बिझनेस कौन्सिल चेम्बर ऑफ कॉमर्सचे संस्थापक), आयपीएस अधिकारी मोहन राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात महोत्सवाचा लोगो आणि अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पंकज बेरी, मानव सोहल, श्रावणी गोस्वामी, ब्राइट आउटडोर मीडिया लिमिटेडचे योगेश लखानी, अर्चना जैन, एकता जैन, शिवम मिश्रा, सेलेब्रिटी ॲस्ट्रॉलॉजर नरेंद्र शास्त्री उपस्थित होते. कमांडर शांगप्लियांग यांनी यावेळी मेघालय चित्रपट धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

‘मेघालय अतिशय निसर्गसुंदर, शांतपूर्ण आणि अनेक रमणीय स्थळे असलेला प्रदेश आहे. कोलकत्ता, दिल्लीवरून शिलॉंगसाठी थेट फ्लाईटही आहेत. इथले चित्रपटकर्मी तिथे चित्रीकरणासाठी आले तर त्यांना मेघालय सरकारकडून सहकार्य मिळेल’, अशी माहिती त्यांनी दिली.

मेघालयमध्ये पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ६५ हून अधिक चित्रपट आणि लघुपटही दाखवण्यात येणार आहेत. एबीके मीडिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक संचालिका अरुणा चक्रवर्ती यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले.

दिलीप ठाकुर

– लेखन : दिलीप ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?