केनरोकुएन उद्यान
कानाझावा शहरात अतिशय भव्य, सुंदर असे केनरोकुएन उद्यान आहे. १६७६ साली कागा राजवटीच्या पाचवा राजा माएडा ट्सूनानोरी याने त्याचे निवास स्थान बदलून ते आताच्या जागेत आणले आणि त्याच्या निवासस्थानाच्या अवती भवती हे उद्यान उभारायला सुरूवात केली. पुढे पुढे काळानुरूप त्याचा विकास होत गेला आणि ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले.
या उद्यानात अगदी छोट्यात छोट्या फुलझाडांपासून तो उंचच उंच, विविध प्रकारची झाडे आहेत. बऱ्याच झाडाच्या फांद्यांना लाकडी टेकू दिले आहेत.
हे उद्यान स्वच्छ ठेवणारे कर्मचारी इतके मन लावून काम करीत होते की, पडद्यावरच्या नट्या आणि जाहिरातीतील मॉडेल पेक्षा या कर्मचाऱ्याबरोबर फोटो काढून घेण्याचा मोह मला आवरता आला नाही !
असे हे नयनरम्य उद्यान म्हणजे landskeping चा उत्कृष्ट नमुना आहे. आणि इतकी वर्षे त्याचे इतके सुंदर जतन, संवर्धन केल्याबद्दल स्थानिक नागरिक, नगर पालिका, जपान सरकार नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. या उद्यानाला जपान सरकारने विशेष दर्जा दिला आहे.
जग किती बदलत आहे, ते पहा.
आम्ही भारतीय, जपान पहायला आलेलो आणि आमची आजची गाईड होती ती, जर्मनी हून आलेली ल्युसी फ्रांझ. तिचे पती कानाझावा विद्यापीठात जीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि आवड म्हणून ती गाईड चे काम करत असते. या जर्मन गाईडचे इंग्रजी उच्चार समजून घेणे तसे कठीणच जात होते. पण तिचे कौतुकही वाटत होते.
क्रमश:
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +919869484800