श्रीक्षेत्र देहूगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा मित्र मंडळाने २५ वर्षे पूर्ण होऊन २६ व्या वर्षात पाऊल ठेवले आहे. याचे औचित्य साधून मंडळाने पंचक्रोशीतील महिलांचा “तेजस्विनी सन्मान २०२३” देऊन त्यांचा गुणगौरव केला. या कार्यक्रमात सौ. मेहमूदा रसुल शेख कवयित्री, गझलकारा, चारोळीकारा, लावणीकारा लेखिका यांना “तेजस्विनी सन्मानाने” सन्मानित करण्यात आले.
यावेळी मंडळातील अध्यक्ष श्री.सोमनाथ चव्हाण, उपाध्यक्ष श्री. मयुर गायकवाड, श्री.यश साळुंखे, सचिव श्री. शैलेश चव्हाण, श्री. दिनेश कुंभार, कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र मोरे, सहसचिव श्री. मच्छिंद्र चव्हाण, श्री. संदीप शिंदे, खजिनदार श्री. सागर गायकवाड, कु. संकेत हजारे, मंडळाचे आधारस्तंभ श्री. विशालने परदेशी संचालक, बाणेर नागरी पतसंस्था देहू, प्रसिध्दी प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस देहूनगरी, निमंत्रक सौ. पौर्णिमाताई विशाल परदेशी, सभापती महिला बाल कल्याण समिती, प्रथम नगराध्यक्षा देहूनगरी, श्री. रमेश पांडे, सृजन फौंडेशनचे संस्थापक श्री. विकास कंद व पंचक्रोशीतील नागरिक व इतर मान्यवर पाहुणे उपस्थित होते.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800