Sunday, November 2, 2025
Homeबातम्यामेहमूदा शेख : अनेक पुरस्कारांनी सन्मानित

मेहमूदा शेख : अनेक पुरस्कारांनी सन्मानित

जागतिक महिला दिन श्री क्षेत्र देहुगाव येथील सौ मेहमूदा शेख (गुलपरी) यांच्यासाठी जणू सुवर्ण क्षण घेऊन आला.

जागतिक महिलादिना निमित्त त्यांना दोन कार्यक्रमात जाण्याचे भाग्य लाभले. पहिला कार्यक्रम सकाळी ११.०० ते ४.३० साहित्य सारथी कला मंच महाराष्ट्र राज्य, शाखा पुणे यांनी घेतलेल्या काव्य स्पर्धेत त्यांच्या कवितेला “उत्तेजनार्थ बक्षिस” मिळाले आणि नंतर ४.३० ते ८.०० उद्योगिनी ग्रुप तर्फे “उद्योगिनी हिरकणी २०२४” पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात. खूप दिवसांनी उद्योगिनी समुहाच्या संस्थापक अध्यक्ष पल्लवी मॅडम यांना भेटून दोघींनाही फार आनंद झाला. २८००० उद्योगिनींच्या ग्रुपला जोडल्याचा त्यांना फार अभिमान वाटतो. त्यांची एक कविता जर या ग्रुपवर टाकली तर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होतो.

दिनांक ९ मार्च रोजी ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या रमजान विशेषांक “इखलास” प्रकाशन सोहळ्यासाठी मेहमूदा शेख यांनी हजेरी लावली. तिथे त्यांची ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, पुणे शाखा सचिव पदावर नियुक्ती करून त्यांना महिला जागतिक दिनाचा सुखद धक्का मिळाला.

दिनांक १० मार्च रोजी दिल्ली येथील नॅशनल वुमेन्स पार्लमेंट २०२४ आयोजित “नॅशनल वुमेन्स एक्सलेंन्स अॅवॉर्ड २०२४” सोहळ्यासाठी त्यांची निवड झाली व दिल्ली येथे जाऊन राष्ट्रीय पुरस्काराच्या त्या मानकरी झाल्या. या नेत्रदीपक सोहळ्याने त्यांचे मन आनंदाश्रूंनी भरून आले.

जागतिक महिला दिनानिमित्त अहमदनगर येथे ए. आर. न्यूज लेडीज प्लॅटफॉर्म तर्फे “ती”चा सन्मान महिला दिन पुरस्कार २०२४” त्यांना मिळाला. मैत्री कट्टा कवी मनाचा साहित्य समूहाने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान “ती चा गुणगौरव पुरस्कार २०२४” ने सन्मानित केले. त्या नंतर हजारो महिलांना आपल्या सोबत घेऊन चालणा-या स्मार्ट सखी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सीमा सुतार व वृषाली महाजन यांच्या स्मार्ट सखी समूह तर्फे “स्मार्ट सखी गौरव पुरस्कार २०२४” ने त्यांना सन्मानित करण्यात आले. एस. पी. इंग्लिश स्कूल वाघोली येथे वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये पाचारण करण्यात आले. त्या कार्यक्रमासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे शिष्य व इस्त्रोचे निवृत शास्त्रज्ञ (सायंस्टीस्ट) डॉ.बाला रामकृष्ण यांची भेट झाली. त्यांच्या सोबत डॉ.दिपेश शर्मा, गॅस्ट्रोएन्टेरोलाॅजिस्ट हेपॅटोलाॅजीस्ट हे ही आले होते त्यांची ही भेट झाली. अशा महान व्यक्ती की ज्यांची भेट होणे आयुष्यात शक्य नव्हते अशा महान व्यक्ती बरोबर स्टेज शेअर करण्याचे भाग्य टी. टी. एज्युकेशन सोसायटी वाघोलीच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. सादिया सैय्यद/पठाण व डॉ. समीर सैय्यद यांच्यामुळे त्यांना मिळाले. या सर्व मंडळींनी त्यांना अतिउच्च पदावर नेऊन ठेवले.

जागतिक दिनानिमित्त जे पुरस्कार प्राप्त झाले आहेत या पुरस्कारांची मानकरी मी एकटी नसून यात माझे कुटुंब, नातलग, सगेसोयरे, मित्र मैत्रिणी व माझ्या श्रीक्षेत्र देहूगाव व कान्हूर मेसाई या गावातील लोकांचाही सहभाग आहे. या सर्वांच्या आर्शिवादामुळेच मी या टप्प्यावर येऊन पोहोचले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, अशी भावना मेहबूबा शेख यांनी व्यक्त करून महिला दिनानिमित्त पुरस्कृत करणा-या सर्व संस्था अध्यक्ष, संयोजक, आयोजक यांचे मन:पूर्वक आभार मानले आहे.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on गझल
Priyanka Shinde Jagtap on पुस्तक परिचय
मोहन आरोटे on निवृत्तीचे तोटे !
Meera Rajesh Khutale on बदललेली ती….
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप