माझ्यातील ‘ मी ‘ ची ओळख करून देते,
ती मैत्री असते………
सुंदर कुरूप असा भेदभाव नसतो,
ती मैत्री असते……..
मान अपमान पैसा प्रतिष्ठाच्या पलीकडची,
ती मैत्री असते………
ठरवून पारखून केली जात नाही,
ती मैत्री असते……..
समजून घेण्याची जेथे खात्री वाटते,
ती मैत्री असते……..
दुःख अर्धे, तर आनंद द्विगुणित करते,
ती मैत्री असते………
डोळ्यातील हावभाव वाचता येते,
ती मैत्री असते……….
मन वाचण्याची एक अद्भुत कला,
ती मैत्री असते………
कितीही कामात असताना वेळ देते,
ती मैत्री असते………
आपली मनापासून ज्यांना काळजी वाटते,
ती मैत्री असते………
मनातील घालमेल सांगता येते,
ती मैत्री असते………
स्वतःला सिद्ध करण्यासाठी गरज नसते,
ती मैत्री असते……..
खऱ्या खोट्याची साक्ष द्यावी लागत नाही,
ती मैत्री असते………
आपले अस्तित्व हे ज्याचे जीवन असते,
ती मैत्री असते………
नव्याने जगण्याची उमेद देते,
ती मैत्री असते………
एकटेपणात सोबत करते,
ती मैत्री असते……….
हक्काने रागावते, चेष्टा मस्करी करते,
ती मैत्री असते……….
मी आहे ना ही आपलेपणाची जाणीव देते,
ती मैत्री असते……..
लांब राहून देखील सोबत करते,
ती मैत्री असते……..
आपल्याला आहे तसे स्वीकारते,
ती मैत्री असते……..
कोणतेही नियम, अटीतटी नसते,
ती मैत्री असते…….
अश्रूंना मोकळी वाट देते,
ती मैत्री असते…….
तुझ्यासाठी काही पण असे म्हणू शकते,
ती मैत्री असते…….
सर्व जगाशी लढण्याचे सामर्थ्य देते,
ती मैत्री असते……
विश्वासाच्या धाग्याने जोडलेले अतूट नाते,
ती मैत्री असते……….
अदृश्य नाळ जी हृदयाची भाषा समजते,
ती मैत्री असते………
निर्मळ अंतकरणाने जोडलेले पवित्र बंधन,
ती मैत्री असते…….
निस्वार्थी प्रेम निरपेक्ष भावनेने केली जाते
ती मैत्री असते….
परमेश्वराने दिलेली अनमोल भेट,
ती मैत्री असते…..

– रचना : रश्मी हेडे. सातारा
मैत्री शिवाय जीवन म्हणजे व्यर्थ आहे ,मैत्रीबद्दलची संकल्पना अप्रतिम पद्धतीने मांडली आहे💐
खूप छान वर्णन कवितेतून शब्दबध्द केलेत 👌👍👍🎉🎉
मैत्रीची कविता नं व्याख्या
अप्रतिम. 🌹🌹
रश्मी हेडे
🌹🌹
💦 मैत्रीची ओळख खुप छान प्रकारे करून दिली.
सुंदर रचना केली.
👌👌👍👌👌