Home लेख मैत्री

मैत्री

0

हाकेला ओ देणारी, न सांगतां मनातलं ओळखणारी,  दु:खात अश्रू पुसनारी, सुखात सावध करणारी, ती असते आपुली सखी, मैत्री.

मैत्रीला वेळेचे, वयाचे, काळाचे, असे कशाचेही बंधन नसते. मैत्री केंव्हाही, कुठेही, कोणाशीही होवू शकते. मात्र ती दोन्हीं बाजूंनी संभाळली पाहिजे.

बालवयात झालेली मैत्री पुढे टिकूही शकते, बदलू ही शकते. पण मैत्री हा विषयचं जिव्हाळ्याचा आहे. पुर्वी स्त्रीपुरूष मैत्री निषिद्ध मानली जायची. आता तो ही काळ बदलला. मुलामुलीतही छान मैत्री असते.

मी तर म्हणते माणसाची कुणाशीही मैत्री होवू शकते. जसेकी, मायलेकींच्यात, सासूसुनेत, आजीनातवात इतकचं काय प्राणी, पक्षी, झाडे वेली फुलं कळ्या अगदी अशा सगळ्यांशी मैत्री होवू शकते. कामवाली, भंगारवाली यांच्याशीही मैत्रीचं नात जपता येत. आणि ते माणूसकिच्या नात्याने जपतोही.

आता आपलंच बघा की, आपण एकमेकास कधी पाहिलेही नाही तरी किती छान ट्ट्यूनिंग जमलय ! पटतय ना ? कश्या एका विचाराने सगळ्या जणी चाललोय.

तुकोबांनी आपल्याला सांगून ठेवलय, वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरी मग आपण तरी का मागे राह्यचे ?

चला… मैत्रीचे नाते जपूया, मानवी जीवन आनंदी करु या.

आशा दळवी

– लेखन : आशा दळवी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version