Home Uncategorized स्वप्नांचे आभाळ

स्वप्नांचे आभाळ

0

सजे स्वप्नांची पालखी
निजलेल्या पापणीत
एक आभाळ देखणे
दिनरात खुणावित

दूर क्षितिजाच्या पार
उंच स्वप्नांचा मनोरा
खळाळत्या सागरात
कसा गाठू मी किनारा

धृवतारा तो अढळ
चांदण्यात विसावला
झाले ठेंगणे आभाळ
त्याच्या अढळपणाला

संसारात सुख माझे
मधुबाग फुललेली
काळजाच्या ग कुपित
किती उराशी जपली

खेळ उनसावल्यांचा
प्राक्तनाचा खेळ सारा
जीवनाच्या सागरात
गाठू सुखाचा किनारा

पल्लवी उमरे

– रचना : पल्लवी उमरे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version