माझी कोणती कविता शेवटची असेल सांगता येत नाही…
शब्द कोणता येईल शेवटी हाही कसलाच अंदाज नाही…
वाईट वाटलं ना वाचून…
आला असेल राग…
म्हणणं माझं इतकंच आहे…
माणसा…नीट वाग…
तुम्ही म्हणाल आज हिला नेमकं काय झालं…
प्रसन्नतेच्या झऱ्याचं पाणी गढूळ का झालं…???
इतकं भयानक वास्तव असं सामोरं येताना…
वेदनेचा बांध फुटतो पुन्हा पुन्हा कन्हताना…
जायचं आहे सर्वांनाच पण असं जायचं नाही…
जाण्याचं कारण माझं मीच व्हायचं नाही…
तुमची वाट पाहणारे सारे घरात आहेत…
हसत जीव टाकणारे हजार मित्र जगात आहेत…
सगळं काही करा पण जरा काळजी घेऊन…
निष्काळजीपणा नको… चाला जरा भान ठेवून…
येईल जेव्हा वेळ तेव्हा दिमाखात जाऊ…
सायरन सोबत आपल्याला जायचं नाही भाऊ…
सांगा जरा ठणकावून स्वतःच्याच मनाला…
माझं अनमोल आयुष्य मी नाही लावणार पणाला…
राहा उभे खंबीरपणे काळजी घेत स्वतःची…
खचू नका भक्कम मोट बांधू आपण एकीची…
– रचना : स्मिता धारूरकर.
अप्रतिम शब्दरचना वाचताना आपणच आपले आयुष्य वाचावे इतकी सुंदर 👌👍💐💐