बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम, २०१५) नुसार केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या दत्तकविधान नियम, २०२२ नुसार अनाथ, सोडून दिलेल्या, त्याग केलेल्या बालकांचे नैसर्गिक पालक मिळून येण्यासाठी त्या बालकांची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.
बाल कल्याण समिती, ठाणे यांच्या आदेशानुसार वात्सल्य ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या नवी मुंबईतील सानपाडा येथील बालिकागृहात कुमारी मोनिका बाबिया आणि कुमारी कोमल तिवारी या दोन बालिका दाखल करण्यात आल्या आहेत. या बालिकांना दत्तक देण्यापूर्वी त्यांचे नैसर्गिक पालक व नातेवाईक यांचा शोध घेणे आवश्यक असून यासाठी या दोन्ही बालिकांची माहिती पुढे देण्यात येत आहे.
मोनिका बाबिया : मोनिका बाबिया ही १ जून २००९ रोजी जन्मलेली बालिका १५ वर्षांची आहे. तिला रोटरी क्लब प्रतिनिधी व रामनगर पोलीस स्टेशन, डोंबिवली (पु) यांच्यामार्फत वात्सल्य ट्रस्ट, मुंबई सानपाडा बालिकाश्रमात २६ जून २०१५ रोजी दाखल करण्यात आले आहे. ही मुलगी डोंबिवली शहरामध्ये तिच्या आईसमवेत राहत होती. ती आयरे रोड, मढवी स्कूल मैदान, डोंबिवली (प) येथे मजुरीच्या आलेली कामावर आलेली असावी, असा तेथील लोकांचा अंदाज होता. मोनिकाचे वडील तिला व तिच्या आईला सोडून गेल्याने तिची आई मानसिक आजाराने त्रस्त होऊन मोनिकास घेऊन भीक मागत असे. त्यामुळे मोनिका हिला संस्थेत दाखल केले गेले व तिच्या आईला ठाणे मनोरुग्णालय येथे रोटरी क्लबच्या प्रतिनिधींनी दाखल केले. संस्थेत दाखल झाल्यापासून या मुलीस कोणीही पालक किंवा नातेवाईक भेटण्यास आलेले नाहीत.
कोमल विनय तिवारी : कोमल विनय तिवारी या बालिकेची जन्म तारीख ३० एप्रिल २००९ अशी असून तिचे वय १५ वर्षे ६ महिने इतके आहे. ही बालिका बालकल्याण समितीच्या आदेशाने या दिनांक ०७ मे २०२२ प्रवेशित आहे. चाइल्ड लाईन मार्फत व बाल कल्याण समिती, ठाणे यांच्या आदेशाने मा. नीकेतन या संस्थेत दि.१७ जुलै २०१९ रोजी दाखल करण्यात आली आहे. कोमल ला ऋषी नावाचा भाऊ असून तो उल्हासनगर मधील शासकीय संस्थेत दाखल आहे. मुलांना संस्थेत दाखल केल्यानंतर ०९ नोव्हेंबर २०२० रोजी आई ; संध्या विनय तिवारी हिचे निधन झाले आहे. पालकांना संपर्क करण्यासाठी प्रयत्न केला असता शेजारी राहत असलेल्या व्यक्ती सांगितलेल्या माहिती नुसार वडील हे ट्रेन अपघातामध्ये मयत झाले असल्याचे सांगण्यात आले पण कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. संस्थेत असल्यापासून कोणीही पालक व इतर नातेवाईक भेटण्यास आले नाही.
तरी या दोन्ही बालिकांच्या पालकांनी अथवा नातेवाईकांनी ही माहिती प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत खालील पत्त्यावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात येत आहे.
वात्सल्य ट्रस्ट मुंबई, प्लॉट क्र.११, सेक्टर-०२, सानपाडा, नवी मुंबई, जिल्हा- ठाणे
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800