Friday, October 17, 2025
Homeसाहित्यमोबाईल एक ब्रह्मास्त्र

मोबाईल एक ब्रह्मास्त्र

गर्भात केलेस मोबाईलव्ह्यू अभिमन्यू,
जन्मताच तुजसाठी
आय लव्ह यू ॥

जेथे जावे तेथे तू सोबती,
जणू शरीर अवयव
सदा संगती ॥

तासन् तास असतोस तू हातात,
शरीर सुटले साऱ्यांचे
निद्रानाश आजारात ॥

कोण आहे मालक नि कोण नोकर,
शयनगृहातही असतो
तुझाच जागर ॥

व्यसन लावून वेड लावलेस,
साऱ्या विश्वाचे
भान हरवलेस ॥

ब्रह्मास्त्र यंत्र तू आजच्या युगाचे,
अति वापराने
बळी घेतोस मानवाचे ॥

संपली नाती नि वाढला दुरावा,
झाली तरुणाई एकलकोंडी
विक्षिप्त देखावा ॥

प्रश्न टाकताच उत्तरे देतोस पटपट,
आळसावली मुले
केलीस बुद्धी भ्रष्ट ॥

अजगरी विळखा घातलास मानवाला,
गिळंकृत करू पाहतोस
आजच्या पिढीला ॥

तू जेवढा वाईट तेवढाच चांगला,
मर्यादा राखू
नव्या संकल्पात हाताळताना तुला ॥

वर्षा भाबल.

— रचना : सौ. वर्षा भाबल. नवी मुंबई.
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप