मोरपिस पाहताना
आठवतो मज कान्हा
लडीवाळ त्याच्या लीला
हिंदोळत नेती पुन्हा
वृंदावनी दिसे कान्हा
नवनीत चोरी सदा
यशोमति मय्या पुन्हा
विनवित नित्य पदा
गोकुळात असे सदा
मधुबनी रास लिला
राधिकेस मोहविण्या
मुग्धस्वर बासरीला
मोरपिस कृष्णाचे
आभूषण मस्तकीचे
अलगुज वाजतसे
हृदयीच्या भावनांचे

– रचना : शिल्पा कुलकर्णी, अमेरिका