बरेचदा ते प्रश्न, मौनानेच सुटतात,
थोडं बोलणं थांबवा, उत्तरं सुचतात,
गढूळ आहे पाणी, जरा वेळ द्यावा,
थोडे वाहून जाते, मग तळ दिसतात,
तसा थोडा वेळ, द्यावा नियतीला,
तिलाही जरा, मोकळे होऊ द्यावे,
तुम्हा मागे असता, गुरुकृपा खरी,
सारे बदलून जाते, जरा शांत व्हावे,
मौनातून येते ती अपार शक्ती,
बघा जाणीवही कशी समृद्ध होते,
कळते स्वत:ला, आंत आहेच काही,
उर्जा नवी, कार्यसिद्धी जी देते…!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800