(शिरोमणी रचना)
मौन
मन अबोल
अंतःकरणात खूप दाटतात
विविध भाव भावना सखोल…..
मौन
असते मुक्ती
पुढील बोलणे टाळण्याची
अबोल शांततेची एक युक्ती…..
मौन
सांगतं खचित
कधी छबीतून डोळ्यातून
उलगडतं मनातील हळवं गुपीत…….
मौन
दुःखाला पचवतं
भावनेचा उचंबळतो सागर
वरवर गंभीर शांत दिसतं..
मौन
आत्मशक्ती जागवतं
संयम आणि विचाराने
बुध्दीची मनाशी सांगड घालतं…
.मौन
असतं निःशब्द
ओठातच विरलेल्या विराणीचे
अबोल नीरव भिजले शब्द….।।
— रचना : अरुणा दुद्दलवार
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800