दर वरसाक आठवणीन ,
पुत्रप्रेम दाकवतास ॥
सागर संगीत पकवानान ,
पुण्यतिथी साजरी करतास ॥
जिवंतपणी नाय बघास ढुंकून ,
मेल्यार फोटो टांगतास ॥
म्हाळाच्या निमसान ,
चंदनाचो हार घालतास ॥
पोटाक चिमटो काढीत ,
जगली अर्ध्यापोटी ॥
म्हाळाच्या पंगतीत ,
बासुंदीची वाटी ॥
थंडीच्या गारठयात ,
फाटकी चादर पांघरी ॥
व्हटी भरतास दिखाव्यात ,
साडी-चोळी भरजरी ॥
म्हातारपणी दवा-दारूक तरसून ,
तळमळत आत्मो गेलो ॥
मोठेपणाचो आव आणून ,
पानाक लावतास बाटली-पेलो ॥
म्हाळ घालतास पितृऋणान ,
जिवंतपणात हाल-हाल करतास ॥
गाव जेवान घालून ,
पितृ-प्रेम दर्शवतास ॥
सेवा करा जिवंतपणात ,
मेल्यार खय पोचता ॥
पुण्य मिळवण्याच्या आशेत ,
मनाक समाधान मिळता ॥
संत-ऋषी गेले सांगून ,
श्रेष्ठ सेवा माय-बापात ॥
माय-बापाक तरास देवन ,
सुख कसा लाभात !!!

– रचना : सौ. वर्षा भाबल.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
म्हाळ ही कविता सवेंदशील आणि वास्तविक आहे.मालवणी भाषा हि देवगड तालुक्यातील आहे ,कारण थोडया अंतरावर बोलीभाषा आणि उच्चार बदलतात.बाकी उत्तम मांडणी केली आहे.अशीच लिहित रहा, देव तुला प्रचंड ऊर्जा देवो.👌👌👌🌹🌹🙏
Agdi barobar