महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने मलकापूर (बुलढाणा) येथे नुकत्याच झालेल्या तिसऱ्या योनेक्स सनराईज महाराष्ट्र स्टेट सिनिअर बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत नगरच्या यश शाह आणि ठाणे येथील रोहन थूळ जोडीने राज्याच्या बॅडमिंटन स्पर्धेतील उपविजेतेपद व मानाचा करंडक पटकाविला.
यश व रोहन सध्या पुणे येथील प्रशिक्षक चैतन्य नाईक अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. दोनीही खेळाडूंनी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जुनिअर गटात यश मिळविलेले आहे.
यश हा सातारा येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात एम.कॉम चे शिक्षण घेत असून रोहन हा एम.बी.बी.एस चे लंडन येथे शिक्षण घेत आहे.
यश चा परिचय
यश याने आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय जुनिअर स्पर्धेत चांगले यश मिळविले असून २०१९ ला, राज्याचे एकेरी व दूहेरीचा मानाचा मुकुट पटकाविला आहे. ५ वेळेला राज्याचा संघातून यश ची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असो.ने यशच्या या खेळातील कर्तृत्वाचा विचार करून असोसिएशनच्या वतीने दोन वर्षांपूर्वी इंडोनोशिया येथे एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी निवड केली होती.
जुनिअर राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत यशने हर्षल जाधव (सातारा) या साथीदाराच्या समवेत ५ वेळा दुहेरीचे विजेतेपद देखील मिळविले असून या वर्षी शिवाजी विद्यापिठातर्फे “खेलो इंडिया” या बंगलोर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली होती.
यश हा गेल्या ६ वर्षांपासून पुणे येथे बॅडमिंटनचा सातत्याने सी.एन.बी.अकॅडमी मध्ये सराव करीत आहे. त्याच्या या यशाबद्धल त्याचे वाडियापार्क बॅडमिंटन मॉर्निंग व ईव्हिनिंग ग्रुप यांनी अभिनंदन केले आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800