नगर येथील बॅडमिंटन खेळातील उदयोन्मुख खेळाडू यश शहा व सई काळे यांची “खेलो इंडिया” या अ.भा. महाविद्यालयीन बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली.
भोपाळ येथे दि. 5 ते ९ जानेवारी २०२२ दरम्यान संपन्न झालेल्या वेस्ट झोन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये त्यांनी हे सांघिक यश संपादन केले. या स्पर्धा असोसिएशन ऑफ इंडियन युनिर्व्हसिटीच्या वतीने राजीव गांधी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या नवीन हॉल मध्ये घेण्यात आल्या. यामध्ये मध्यप्रदेश, गुजराथ, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा येथील 78 महाविद्यालयीन संघ मुले व 72 महाविद्यालयीन महिला संघाच्या अशा एकूण 1000 खेळाडूंचा सहभाग होता. मध्य प्रदेशचे राज्यपाल मा.मंगुभाई पटेल यांच्या हस्ते या स्पर्धेतील यशस्वी विद्यापीठातील खेळाडूंचा नुकताच करंडक व मेडल देऊन सन्मान करण्यात आला
यश हा सध्या सातारा येथील लाल बहादूर शास्त्री कॉलेज मध्ये एम.कॉम चे शिक्षण घेत असून कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाच्या वतीने खेळत आहे
“खेलो इंडिया” साठी कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू अक्षय कदम, हर्षल जाधव, हर्षित ठाकूर, यश शहा, नरेंद्र गोंगावले, अनिरुद्ध मयेकर व ऋतुराज घोरपडे या खेळाडूंची निवड झाली आहे. त्यांना प्रा.राजेंद्र रायकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. प्राचार्य रवींद्र शेजवळ यांनी या राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्धल सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेमध्ये मुंबई व राजस्थान येथील विद्यापीठाच्या बलाढ्य संघावर मात करुन या खेळाडूंनी हे यश संपादन केले आहे. यश हा पुणे येथील प्रतिथयश कोच चैतन्य नाईक यांच्याकडे दोन वर्षांपासून बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे व सई काळे ही पुणे विद्यापीठाकडून खेळत आहे. ती सारडा कॉलेजमध्ये एफ वाय बी कॉम चे शिक्षण घेत आहे. सईच्या यशाबद्धल सारडा चे प्राचार्य डॉ .राजेंद्र शिंदे यांनी तिचे अभिनंदन केले आहे . तिला प्रो संजय धोपावकर प्रो. संजय साठे व मल्हार कुलकर्णी याचे मार्गदर्शन आहे.
या अखिल भारतीय विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धा दि. 25 जानेवारी 2022 रोजी रांची येथे संपन्न होणार होत्या, परंतु कोव्हिड महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे सामने पुढे घेण्यात येतील, अशी माहिती संबंधितांनी दिली आहे.
यश व सई यांच्या उतुंग यशाबद्दल वाडिया पार्क बॅडमिंटन ग्रुप, अहमदनगर क्लब बॅडमिंटन ग्रुप व नगरमधून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

– देवेंद्र भुजबळ. 9869484800