Monday, February 16, 2026
Homeसाहित्ययुद्ध नको, बुद्ध हवा

युद्ध नको, बुद्ध हवा

युद्ध नको
पण बुद्ध हवा
मंत्र जीवनाचा
हा हवा

गौतमा एकदा
पुन्हा जन्माला ये
शांतीचा संदेश
पढवून दे

हरपून गेली आहे
आमची शुद्ध
भानावर आणतील
गौतम बुद्ध

बा सिद्धार्थ गौतमा चरणी नतमस्तक
काळ बदलला
देतोय नैतिकतेची दस्तक

भीमा तुज
निर्मिला मातेने
घडविला आहे
तुज बुद्धाने

निस्वार्थ निभवला
एकच धर्म
केवळ मानवतेसाठी मानवधर्म

कविता बिरारी

– रचना : कविता बिरारी
– संपादन  :देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11