Homeसाहित्ययुध्द विराम ..

युध्द विराम ..

भडकणारं म्हणता
जाहीर युध्द विराम
सुटकेचा रे निश्वास
निर्णय रे अभिराम

घातल्या अटी शर्ती
दिसतोस्वल्पविराम
अंतस्थ ती मळमळ
शमला नाही संग्राम

अवघ्या जगता उगा
दरदरून फोडा घाम
विध्वंसवृत्ती दावली
पुरेसे झाले बा काम

विनाशकशक्ती दिसे
कृतीतून प्रवृत्ती वाम
नुकसानकेले सर्वांचे
काय मिळाले इनाम

दिसली क्रूरमनोवृत्ती
अडेल विचारात ठाम
जखम सळ सळणारं
कितीहीलावावा बाम

उशीरा ये शहाणपण
युध्दात न काही राम
पुनश्च ना उसळे युद्ध
करुनपुढीलं इंतजाम

काय मिळवले जाणा
वेठीला जग हे तमाम
काय गमावले जाणा
घालवूनबसा इतमाम

हेमंत मुसरीफ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments