केंद्रीय लोकसेवा आयोगाने १६ सप्टेंबर २०२२ रोजी घेतलेल्या मुख्य परीक्षेत उतीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी दोन दिवसीय “मॉक इंटरव्यू” सत्राचे आयोजन प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. हे “मॉक इंटरव्यू” सनदी अधिकारी घेणार असून पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.
या मॉक इंटरव्यू सत्राचे आयोजन जानेवारी २०२३ मध्ये संस्थेच्या महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय इमारत, तळमजला, कोरस रोड, वर्तक नगर, ठाणे (प) कार्यालयात करण्यात आले आहे.
या “मॉक इंटरव्यू” सत्रात वरिष्ठ सनदी अधिकारी मुलाखत घेणार असून यामध्ये ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, सेवानिवृत्त मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन श्री. के. पी. बक्षी, राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य,विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रविंद्र शिसवे, मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ मृदुल निळे, युपएससी अभ्यासक्रमाचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्री. भुषण देशमुख यांचा समावेश आहे.
सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या cdinstitute@thanecity.gov.in या ई-मेलवर आपले DAF-२ अॅप्लीकेशन सादर करावे. तसेच https://forms/gle/X64Enn99MyT9ZYA या लिंकवर 05 जानेवारी, 2023 पर्यंत नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी संस्थेच्या 25881421 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन चिंतामणराव प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केले आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
खूप छान उपक्रम 👍