तुला यायचंच आहे ना
अरे मग ये की
असा गरुडासारखा
घे झेप अन्
सावज पकडून
मार भरारी अवकाशात !
अरे भेकडा सारखा
असा लपून छपून येण्यात
कसली आलीय मौज
होऊन जाऊ दे मग
चार हात
पाहूया कोण जिंकतंय ते
झुंज म्हंटली की
एकच कोणीतरी जिंकणार
होऊन जाऊ दे सामना अटीतटीचा.
कुठल्याही कुबड्यांची
गरजच नकोय मला
दिलंय सर्व काही
झुगारून अन्
साऱ्या शक्तीनिशी सज्ज
आहे मी झुंजायला
तू ही अर्जुन होऊ नये
पाठीवरून वार करायला
आणि मला ही
कर्ण होणं जमणार नाही
अन् अश्वत्थामा !!! तर मुळीच नाही
कशाला उगाच
तेल मागत वणवण फिरणं
जन्माला आलोय ना
तर मृत्यू ही अटळ अविभाज्य
पण हे मरणा !!!!
तुला यायचंच आहे ना
तर मग येना जरा मर्दा सारखा…..
– रचना : सौ.राधिका इंगळे. देवास, मध्य प्रदेश
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800