“ये मेरे वतन के लोगों” हे गीत ऐकलं नाही असा कोणी हिंदुस्तानी नसेल.
लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत भारतीय इतिहासात अजरामर झाल ते लतादीदीच्या आवाजाने !!
त्यांच्या सुमधुर आवाजाने या गीताला योग्य न्याय दिला. लता मंगेशकर यांच्या आवाजाशिवाय या गीताला पूर्णत्वच येऊ शकत नाही.
आजही ते ऐकतांना अंगावर रोमांच उभे राहतात. त्या आपल्याला गत काळात घेऊन जातात. हे गीत ऐकताना डोळे नकळत भरून येतात.
हे गीत भारतीय इतिहासात अजरामर होण्याचे आणखी एक कारण म्हणजे या गीताची रचना.!!
कवी प्रदीप यांनी रचलेल हे गीत आज प्रत्येक भारतीयाच्या ओठावर आल्याशिवाय राहत नाही.
या गीताचा इतिहास मात्र खूप मनोरंजक आहे.
1962 साली झालेल्या भारत-चीन युद्धामध्ये भारतीय जवानांनी रेझान्ग ला येथे 18000 फूट उंचीवरील आपली भूमी शत्रूच्या आक्रमणांनातून वाचवली आणि त्या घटनेतून प्रेरित होऊन कवी प्रदीप यांना हे गीत सुचले.
मुंबईतील माहीमच्या समुद्रकाठी फेरफटका मारत असताना त्यांना ह्या गीताच्या काही ओळी सुचल्या, परंतु जवळ लिहायला काही नसल्यामुळे त्यांनी त्यातल्या बर्याचशा ओळी समुद्रकिनारी पडलेल्या सिगारेट पाकिटामधील अल्युमिनियम च्या पातळ कागदावर लिहिल्या.
सुरुवातीला लता मंगेशकर यांनी हे गीत ऐकल्यावर हे गीत एकीने गाण्या पेक्षा दोघीनी (लता व आशा) गावे असे त्यांना वाटले, परंतु कवी प्रदीप यांना मनापासून वाटत होते की हे गीत लता दीदींनीच गावे. या गीताची तालीम दोघींनी केली मात्र दिल्लीला निघण्याच्या काही वेळ आधी आशा भोसले यांनी त्यातून नाव मागे घेतले.
त्यांचे मन वळवण्याचे काम खुद्द हेमंत कुमार यांनी केले पण त्यांना यश आले नाही.लता मंगेशकर यांनी पहिल्यांदा जेव्हा गीत वाचले तेव्हा त्यांना अक्षरशः रडू आले आणि त्याच वेळी त्यांनी सांगितले की मी हे गीत गाईल परंतु माझी एक अट आहे कि गीताच्या रेकॉर्डिंगच्या वेळी कवी प्रदीप माझ्या सोबत असतील.
आणि त्या नंतर गाण्याचा जो इतिहास घडला सर्वांना ज्ञात आहे.
पंडित नेहरू यांनी त्या वेळी म्हंटल होत की हे गीत ऐकून ज्याची देशभक्ती जागृत होत नाही तो खरा हिंदुस्थानी नाहीच.
27 जानेवारी 1963 ला जेव्हा हे गीत नॅशनल स्टेडियम वर गायलं गेलं त्यावेळी कवी प्रदीप यांना मात्र आमंत्रण नव्हतं आणि याच मुळे ते नाराज होते परंतु लगेच दोन महिन्यांनी पंडित नेहरू जेव्हा मुंबईत एका समारंभाला आले त्यावेळी कवी प्रदीप यांना ते गाण्याचा मान मिळाला.
चला तर बघू या या गीताचा भावार्थ..
ऐ मेरे वतन के लोगों..
तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सब का
लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर वीरों ने
है प्राण गँवाए
कुछ याद उन्हें भी कर लो..
कुछ याद उन्हें भी कर लो..
जो लौट के घर न आए
जो लौट के घर न आए
ऐ मेरे वतन के लोगों ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो क़ुरबानी ||
कवी हे गीत लिहतांना खूप भावुक झाले आहेत. त्यांना सीमेवर आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या अगणित सैनिकांची आठवण यावेळी झाली.
त्यांच मन म्हणत की स्वातंत्र्य मिळाले हा आपल्यासाठी सोन्याचा शुभ दिवस असला तरी हा दिवस साजरा करतांना सीमेवर प्राण गमावलेल्या आपल्या शूर वीरांचे बलिदान मात्र विसरू नका अशी विनंतीच जणू कवी करतायत.
कवी म्हणतात की आज त्यांचीही जरा आठवण काढू जे युद्धाला घरातून गेले परंतु परत येऊ शकले नाही. काही बेपत्ता झाले,काहीना विरमरण आले त्यांनाही या दिवशी आठवू या.
माझ्या देशबांधवांनो,ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी आपले प्राण पणाला लावले त्यांच्यासाठी दुःख व्यक्त करा, डोळ्यात अश्रू येऊ दया.
अनामिक सैनिकांने गमावलेले प्राण
कवी मनाला चटका लावून गेलेत. कवीचे डोळे अश्रूने भरून आलेत….
ऐ मेरे वतन के लोगों……
ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो क़ुरबानी
जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आज़ादी
जब तक थी साँस लड़े वो
जब तक थी साँस लड़े वो
फिर अपनी लाश बिछा दी
संगीन पे धर कर माथा
सो गये अमर बलिदानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
शत्रूच्या हल्ल्याने घायाळ, जखमी झालेला हिमालय आणि शत्रूच्या हल्ल्यातून आपल्या भूमीचे स्वातंत्र्य धोक्यात आले होते. हि भूमी ते काबीज करतील की काय असे वाटले होते पण हे शक्य होईल ?
शत्रूला हे कदापि शक्य नव्हते कारण आमचे सर्व सैनिक अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत लढले आणि शेवटी त्यांचे मृतदेह हे सीमेवर पडले पण त्यांनी इंचभर शत्रूला आपल्या भूमीत येऊ दिल नाही..
प्रत्येक जण बंदुकीच्या टोकावर आपल शीर ठेवून या भूमिसाठी बलिदान देऊन कायमच मरण पत्करल. म्हणूनच आज त्यांचे हे अमर बलिदान जरा आठवा आणि डोळ्यात पाणी येऊ दया…
जब देश में थी दिवाली.
वो खेल रहे थे होली
जब हम बैठे थे घरों में
जब हम बैठे थे घरों में
वो झेल रहे थे गोली
थे धन्य जवान वो अपने
थी धन्य वो उनकी जवानी
जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो क़ुरबानी
कोई सिख कोई जाट मराठा
कोई सिख कोई जाट मराठा
कोई गुरखा कोई मदरासी
कोई गुरखा कोई मदरासी
सरहद पर मरनेवाला..
सरहद पर मरनेवाला हर वीर था भारतवासी
जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी
जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो क़ुरबानी
जेव्हा आपण सर्व इकडे दिवाळी साजरी करत होतो, मात्र ते त्या वेळी सीमेवर होळी खेळत होते.
कोणाबरोबर खेळत होते ते होळी ?
आपल्या दुश्मना बरोबर ते लढत होते त्यांच्या बरोबर रक्ताची होळी खेळत होते, धारातीर्थी पडत होते. आमच्या आनंदासाठी ते त्यांचा जीव तिकडे गमावत होते,आमच्या सुरक्षेसाठी ते सीमेवर मृत्यूला कवटाळत होते.
आम्ही जेव्हा घरात सुखाने बसलो होतो तेव्हा मात्र ते छातीवर गोळ्या झेलत होते.
खरंच भारतवासियांनो, काय ते सैनिक असतील आणि काय त्यांचा तो जोश असेल.. कल्पना करवत नाही..
आणि म्हणून त्यांच्या या वीर मरणाला आज आठवू या आणि डोळ्यात अश्रू भरू या..
आणि हो, सीमेवर मरणारा कोण्या एका धर्माचा नव्हता. कोणी शीख होता तर कोणी मराठा, कोणी गुरखा तर कोणी मद्रासी. भारतातील सर्व प्रांतातून आलेले सैनिक सीमेवर जात पात विसरून लढत होते. सीमेवर मरणारा प्रत्येक जवान हा फक्त एक भारतवासी होता आणि सरहद्दीवर जे रक्त सांडल ते फक्त हिंदुस्थानीच होत.
फक्त हिंदुस्थानी !!!!
थी खून से लथ-पथ काया फिर भी बन्दूक उठाके
दस-दस को एक ने मारा फिर गिर गये होश गँवा के
जब अन्त-समय आया तो कह गए के अब मरते हैं
जब अन्त-समय आया तो कह गए के अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारों..
खुश रहना देश के प्यारों अब हम तो सफ़र करते हैं
अब हम तो सफ़र करते हैं |
या कडव्यात कवीने सैनिकांच्या शेवटच्या क्षणाचे वर्णन केले आहे.
संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले असतांना, अंगात त्राण राहिलेले नसतांना सुद्धा एका एका जवानांने दहा जणांना मारले, शेवटी तेथेच त्यांनी शरीर टाकले आणि जेव्हा शेवटचा क्षण आला तेव्हा सर्व हिंदुस्तानी बांधवांना सांगितले की आमची आता मरणाची वेळ आली आहे, तुम्ही सगळे आता सुखी रहा आम्ही आता आमचा शेवटचा प्रवास सुरु करतो..
अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा सैनिक किती देशाचा विचार करतोय हेच जणू कवीला सांगायचं आहे.
क्या लोग थे वो दीवाने क्या लोग थे वो अभिमानी
जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो क़ुरबानी
तुम भूल न जाओ उनको इस लिये कही ये कहानी
जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो क़ुरबानी!
जय हिन्द जय हिन्द
जय हिन्द की सेना
जय हिन्द जय हिन्द
जय हिन्द की सेना
जय हिन्द जय हिन्द जय हिन्द.
या शेवटच्या कडव्यात कवी आश्चर्य चकित होतोय.
कवी विचार करतोय किती ते देशप्रेमी सैनिक !! किती ती राष्ट्रभक्ती !! किती तो देशाभिमान !!!
तुम्ही या सैनिकांच्या बलिदानाला कधीही विसरून जाऊ नये म्हणूनच मी हे गीत आहे अस कवी या कडव्यात सांगतायत.
अगदी खरं आहे हे गीत ऐकतांना प्रत्येक शहीद जवान या गीतातून आपल्याशी संवाद साधतो असेच वाटते आपल्याला एकजुटीने रहा प्रेमाने रहा, जातपात धर्म बाजूला ठेवून देश वाचवा असा संदेश प्रत्येक शहीद सैनिक देत आहे असे मनोमनी वाटते आणि म्हणूनच या गीताला जिवंतपणा आलाय.
आपण एकजुटीने एकसंघ राहून जातपात, धर्म सोडून जेव्हा एक देश,
हम सब एक है हया विचाराने वागतील तेव्हा खऱ्या अर्थाने या गीताचे सार्थक होईल आणि ती खरी शहीद जवानांना आणि दीदींनी दीदींना श्रद्धांजली असेल.
जय हिंद…..

– लेखन : प्रकाश फासाटे. मोरोक्को
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
लतादीदींच्या स्वरातील आणि कवी प्रदीप यांनी रचलेली
भावनात्मक काव्य रचना ही भारतीय सैनिकांना श्रद्धांजली असून लतादीदींच्या या स्वरातून निघालेले शब्द हे प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रेरणादायी ठरणारे आहेत. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली!
खुप भावनात्मक लेख…लताचे हे गाणं…नुसतेच गाणं नाही तर ते एक अजरामर भारतीय सैनिकाप्रती विनम्र श्रद्धांजली आहे. कवी प्रदीप ना पण विनम्र अभिवादन! जय हिंद!