Monday, December 22, 2025
Homeबातम्यायोगाद्वारे "पोट रोग निवारण"

योगाद्वारे “पोट रोग निवारण”

कुणाचे, कधी, कशामुळे पोट दुखेल हे काही सांगता येत नाही. सकस आहाराचा अभाव, वेळी अवेळी जेवण, बाहेरचे खाणे, व्यायामाचा अभाव अशा एक ना अनेक कारणांनी पोटदुखी होऊ शकते. वेळीच सावध न झाल्यास पोटाचे विविध आजार, रोग होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. हे सर्व पाहून भारतीय योग संस्थान, दिल्लीच्या औरंगाबाद जिल्हा शाखेच्या वतीने नुकतेच औरंगाबादेत “पोट रोग निवारण” शिबिर संपन्न झाले.

प्रमुख पाहुणे म्हणुन मिलींद पोहनेकर, डाॅ. गणेश कल्याणकर, अर्चना निळकंठ, शोभाताई बुरंडे, सरला शिंदे, डाॅ. उत्तम काळवणे, श्री. धनंजय धामणे, मधुकर देशपांडे, रत्नाकर घन, भनोसर महाडीक, साधना सुरडकर उपस्थित होते.

श्री. धामणे यांनी आपल्या मनोगतात भारताची योग परंपरा हजारो वर्षापासुन असून आज 175 देशात योगाचे महत्व पटल्यामुळे 21 जुन “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणुन साजरा करण्यात येतो असे सांगितले.

श्री मधुकर देशपांडे यांनी आपल्या मनोगतात शरीर सुदृढ आणि निरोगी रहाण्यासाठी योगा शिवाय पर्याय नाही, यावर मार्गदर्शन केले.

मधुकर पवार सर यांनी सुक्ष्म व्यायाम, पेट रोग निवारण साठी काही विशेष आसने घेतली. यामध्ये सुर्यनमस्कार, उष्ट्रासन, पवनमुक्तासन घेतले.

यावेळी ‘पोट रोग निवारण’ करण्यासाठी रोजचा आहार कसा असावा, काय खावे, त्याचे प्रमाण, काळजी काय घ्यावी योग, आसन, प्राणायाम, ध्यान या विषयी विस्तृत माहिती दिली. नविन सर्व साधकांना “आहार विशेषांक” भेट म्हणुन देण्यात आला.

किशोर ताकसांडे, विद्या ताकसांडे संजीवनी देशमुख यांनी प्रात्यक्षिकं केली. भाऊ सुराडकर सरांनी नविन साधकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिलेत.

कविता नंदनवार, सुनिता डोमाले, रजनी सुरडकर, अपर्णा आहेर, मधुकर पवार यांच्या सुरेल आवाजातील भजनाने शिबीराची सुरवात झाली. वर्षा देशपांडे यांनी छान सुत्रसंचलन केले. आभार प्रदर्शन मिना पिसोळे यांनी केले.

केंद्र प्रमुख शैलजा शिंदे, रोहीणी खरात, रश्मी व्यवहारे, मंजुश्री लाटकर, ममता शर्मा, विजया कुलकर्णी, साधना टोणगिरे, सुवर्णा दोशी, एकशिंगे सह या भागातील नागरीक उपस्थित होते.

शिबिर यशस्वी होण्यासाठी आयोजक तथा जिल्हा प्रधान भाऊ सुरडकर, विभागीय प्रधान – सुरेश शेळके, विभागीय मंत्री आनंद अग्रवाल, जिल्हा प्रधान संजय औरंगाबादकर, विद्या ताकसांडे, कैलास जाधव, जिल्हा मंत्री मिना पिसोळे, अपर्णा आहेर, वैजीनाथ डोमाले, वर्षा देशपांडे, रजनी सुरडकर, दिलीप तोडेवाले, शिबीर प्रमुख मधुकर पवार, उप शिबीर प्रमुख कविता नंदनवार यांनी सागर निळकंठ, श्री दत्त मंदिर समिती यांनी विशेष परिश्रम घेतले.

या विषयाचे महत्व व गरज ओळखून अशी शिबिरे गावोगावी आयोजित करण्याची आवश्यकता आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”
सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37