आज, २१ जून.आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्या निमित्ताने योगाच्या महती सांगणाऱ्या काही कविता. योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….
१. आरोग्य वृक्ष
आरोग्याचा वृक्ष करपतो
किड आळसाची लागून
अन् व्यसनाधीनता ग्रासता
पडतो चक्रव्यूहात अडकून
निराशेच्या काळोखात मग
एकलता बनते संगिनी
सद्विवेक सद्बुद्धी सह
विचार जातात सोडूनी
धन नाश पावून जातो मान
अन् रुजते बदनामीची ‘सिड‘
योग प्राणायामाने करा नष्ट
आळसाची लागलेली किड
आशेचा किरण येईल घरी
विवेकाची बाग फुलवून
आरोग्याचा दिसेल सुंदर
इंद्रधनुष्य क्षितीजावरुन
आळस, नैराश्य झटकूनी
व्यायामाचे पाणी शिंपडुया
सुवर्णमय आयुष्याची बाग
पुन्हा एकदा सुरेख फुलवुया
यम नियम आसन आणि
प्राणायामाने करा सुद्रुढ काया
प्रतिहार धारणा ध्यान
समाधीने दुर मोह माया

– रचना : ॐप्रकाश शर्मा. नाशिक
२. 💐योग 💐
करा नित्य योगा
बीपी, शुगर सोडा
दूर करी रोगा ||
घाला रोज सुर्यनमस्कार
राहा ताजे दिवसभर
सुधारेल आरोग्य
पहा चमत्कार ||
नित्य करा कपालभाती
कंबर होईल वरतीखालती
चरबी जळेल
पोट जाइल खालती ||
भूजंगासन, शवासन
करा विविध आसने
तरचं होईल सहज
उठने बसने ||
वज्रासनात बसा
बस्रीका करा
मोकळे होतील खांदे
मिटतील श्वासाचे वांदे ||
चालने तर एकदम बेस्ट
राहाल अगदी तंदुरूस्त
अगदी सोपा मुलमंत्र
अंगीकारा, योग, मंत्र ||

– रचना : आशा दळवी. दुधेबावी, फलटण
३. 🌞 करू या योग ….
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी
भारतीय परंपरेतून
आंतरराष्ट्रीय योग दिन
दरवर्षी एकवीस जून…१
दोन हजार चौदामधील
दिनांक अकरा डिसेंबर
संयुक्त राष्ट्र सभा प्रस्ताव
करा योगदिन जगभर…२
सत्तावीस सप्टेंबर चौदा
संयुक्त सभेत आवाहन
स्विकारला मोदींचा प्रस्ताव
सूर्य संक्रांती दक्षिणायन…३
सूर्य दक्षिणायनाचा काळ
आध्यात्मिक सिद्धी प्राप्तीसाठी
उपयोगी अतिमहत्तम
शरीर आणि मनःशांतीसाठी…४
नित्य योगासने प्राणायाम
तंदुरुस्त आरोग्याची हमी
रोगप्रतिकार शक्ती वाढ
वाढता ताणतणाव कमी…५
सकारात्मक बदलांसाठी
योगासने करा आत्मसात
शारीरिक आणि मानसिक
रोगव्याधींवर करा मात…६

– रचना : सौ.वर्षा शरद मुसळे. नाशिक
४. योगसार
गुरुजनांस करुनी वंदन
ॐकाराने प्रथम करु नमन
आतंर काया निर्मळ ठेवू
असो तरुण वा वृद्ध
धौती, नेती, नेत्रस्नानाने
शरीर करुया शुद्ध
प्रारंभी आसनांच्या सुर्यनमस्कार
अनुभवाल योगविद्येचे सार
घेऊ योग्य पदार्थांचे सेवन
राखील योग शरीराची नीट ठेवण
या यंत्रमय युगात होती
शारीरिक, मानसिक छल
त्राटक, प्राणायामाने वाढेल
आत्मविश्वास, मनोबल
रोगमुक्त होऊन शरीर
बने ते निरोगी
निरोगी शरीराचे
मन होई विरागी
गायत्रीमंत्र, ॐ काराने
मन धावे आत्माकडे
मनःशांतीने आत्माचा
मार्ग जाई ईश्वराकडे
जतन करावे, साधकांस द्यावे
असे हे योगविद्येचे ज्ञान
कष्टविना नाही फळ
साधना आणि ध्यान
मिळे योगाने मनःशांती
शरीराला विश्रांती
अखेर योगाचा शांतीपाठ
ॐ शांती..शांती..शांती !!

– रचना : सुरेखा गावंडे. कल्याण(पूर्व)
५. योग : मधुर अमृत
माणुसकीचे मधुर अमृत
प्यावे अन् पाजावे
पाहुणे येता घरा
कपाळी आठ्यांचे जाळे नसावे
सुसंस्काराचे बाळकडू
कृतीतून आपुल्या नव्या पिढीस द्यावे
आभाळाहूनही मोठे
मन सर्वांचे व्हावे
गीत प्रेम सेवेचे मानवतेचे
विश्वधर्माचे जगी घुमावे
दीन दुःखितांना मदत करूनी
समाधान खरे मिळवावे
मर्म भारतीय संस्कृतीचे शिकूनी
माणसाने माणुसपण जपावे
नाहीच काही देता आलं तर
निदान शब्द दोन प्रेमाचे द्यावे
यशाचे एव्हरेस्ट गाठले तरी
विनम्र भावनेचे फूल मनी फुलावे
जगी चांगले जे जे, ते घ्यावे
तन मन धन अर्पूनी
राष्ट्रभक्तीच्या यज्ञातली समिधा
होण्याचे भाग्य मनुजा मिळवावे
संत महात्म्यांच्या आदर्शातून
सर्वोत्तम योगी आपण व्हावे

– रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई.
– संपादन:अलका भुजबळ. ☎️ 9869484800
🌹खूप सुंदर कविता सर्व 🌹
सर्व कविचे अभिनंदन
अशोक साबळे
अंबरनाथ, ठाणे
सर्व कविता छान आहेत 👌👌👌👌👌👍👍