स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पलपब प्रकाशन नवी मुंबई साहित्य परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय ऑनलाइन काव्य संमेलन चांगलेच रंगतदार ठरले.
या काव्य संमेलनासाठी १ ऑगस्ट २०२५ पासून व्हॉट्सॲप लिंक वर कवी, कवयित्री यांना या काव्य संमेलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ३० जणांनी नोंदणी केली होती. १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४:०० वाजता गुगल मीट ऍपवर काव्य संमेलनाची सुरुवात झाली. नवी मुंबई पलपब अध्यक्ष श्री.जयराम मांजरे पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

त्यांतर सहभागी कवी कवयित्री यांनी ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ या विषयाच्या अनुषंगाने आपापल्या कवितांचे सादरीकरण केले.
सहभागी सारस्वत आणि त्यांच्या कवितेचे शीर्षक पुढीलप्रमाणे होते.
श्री.दिलीप देवराम जाधव = पालघर, विषय :- स्वातंत्र्य संग्राम
जहाँआरा रंगरेज = वडोदरा (गुजरात), विषय :- जश्न ए आज़ादी
सौ. शशिकला शिवाजी कुंभार = ठाणे, विषय :- भारत माँ
सौ.सुरक्षा पाटील = टिटवाळा, विषय :- स्वातंत्र्य गान
श्री.सुदाम कटारे = मुंबई, विषय :- स्वातंत्र्य
अतुल मोरे = मोहोळ, जि. सोलापूर, विषय :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
श्री.ज्ञानेश्वर शांता विठ्ठल चौरे = नाशिक, विषय :- वंदना
कौसर दिवान = अहमदाबाद (गुजरात), विषय :- हिंदुस्तान मेरी पहचान
श्री.गजानन दिनाजी चौहान = परभणी, विषय:- टेक ( प्रतिज्ञा)
श्री. सचिन अनंता ढाकणे = बार्शी जि.सोलापूर, विषय :- अमृत महोत्सव
श्री.प्रशांत मधुकर बचूटे = विरार जि.पालघर, विषय :- जवान
अॅड. रश्मी अशोक पाटील = नांदगाव, पालघर, विषय :- स्वातंत्र्य हा मुक्त श्वास
कु. युवराज्ञी सोनवणे (काव्यराज्ञी) ओतूर. ता. जुन्नर, जि. पुणे., विषय :- कफनवीर
वंश कांता संजय काळे = नागपूर, विषय :- भारत राहिला पाहिजे
श्री.स्वप्नील शंकर पाटील = भिवंडी, विषय :- स्वातंत्र्याचे अमृत गान
सौ. प्रतिक्षा अविनाश ठाकरे = विषय :- सैनिक
श्री.बाळकृष्ण दत्तात्रेय घरत = पनवेल (रायगड), विषय :- म्हणजे स्वातंत्र्य
सौ.सरोज सुरेश गाजरे = भाईंदर (ठाणे), विषय :- सांस्कृतिक धारा
सौ.नंदा कोकाटे :- ठाणे, विषय :- माझी प्रिय मायभूमी
श्री.राजेंद्र सातवी सर = अबुधाबी, विषय :- मेरी पहचान ही तिरंगा है.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन, पलपब नवी मुंबई उपाध्यक्ष श्री.विलास राठोड सर व श्री.गोरखनाथ यादव यांनी केले.
पलपबच्या सौ.लीना पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्री.किरण तोडकर यांनी नवी मुंबई कार्यकारिणी जाहीर केली. नवी मुंबई सचिव श्री. संतोष शिरावले यांनी सुंदर शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. नवी मुंबई कार्यकारिणीतील ग्राफिक डिझायनर श्री.सनी ढाकणे यांनी ओजस्वी शब्दांत आभार प्रदर्शन केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800