रंग खेळु चला
रंग उधळु चला
आज रंगपंचमी
धमाल करु चला ॥१॥
प्रेमात भिजुया सारे
रंगात खेळ खेळुया
जीवनात आनंद भरु
मस्तीत सारे जगुया॥२॥
मानवतेचा रंग खुलवुया
द्बेषाला प्रेमाने हरवुया
एकात्मतेचा रंग जागुया
नवा संदेश देऊया ॥३॥
अहंकार नको ठेवुया
सर्वांना आदर देऊया
रंग विविधतेचा आपला
एकात्मतेच्या रंगात सारे रंगुया ॥४॥
— रचना : पंकज काटकर. काटी, जि.धाराशिव
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800