भरली रंगाची पिचकारी
कान्हा भिजेल माझी साडी
होईल रंगाचा बेरंग
कान्हा रे सोडी माझा संग.
तुझ्या रंगाने भिजले माझे अंग.
जाऊ दे मला धनी माझा करील रंगाचा बेरंग!
रंग खेळीरे गोपीका संग.
गौळणी झाल्या खेळात दंग
मी सासुरवाशीण धाक मजला
चल जाऊ दे घरी कान्हा मजला
सासू सासरे करीती मला तंग
ओले झाले रे अंग
नको अडवू तू माझी वाट
लेकुरे बाळे पाहती वाट.
किती विनवू तुला मी सांग
करु नको असाही हट्ट
भवसागर तरण्याला दावली वाट
भक्ती रंगात रंगले
नको अडवू दाखवू
नको अवघड घाट
नको मारू पिचकारी
रे कान्हा मला जाऊ दे घरी
सासू सासरे करतील कायतरी
काळजी आहे अंतरी

– सुरेखा तिवाटणे. पुणे