रक्तदान कर रे मानवा रक्तदान कर
श्रेष्ठदान कर रे मानवा श्रेष्ठदान कर
तुझ्या रक्ताचा बूँद येईल रे कामी
देश सेवा घडेल रे तुझ्या नामी
रक्तदान कर रे………!
कर रक्तदानाचे हे पुण्याचे काम
होईल तुझे उपकार, जग जेठी नाम
तुझ्या रक्तामुळे वाचतील हे अनेक जीव
अशी कशी नाही तुला या मानवाची कीव
रक्तदान कर रे……….!!
या मानव जन्मामध्ये करता येईल रे रक्तदान
पुढील जन्म कोण पाहिले ते तू जान
म्हणून हे व्रत समजून कर तू रक्तदान
आजारी मानवाची कदर तू रे जान
रक्तदान देऊनी तू होशील रे महान
रक्तदान कर रे………..!!!
श्वास कधी थांबेल ते कोण रे जाणे
रक्त देऊनी तुला नाही पडणार ऊणे
असे हे कर रे मानवा महान काम
चालता चालता तुला करितो मी राम राम
रक्तदान कर रे मानवा…….!!!!

– रचना : विनोद प्रल्हाद भांडारकर
आदरणीय सर
नंबर वन
आदरणीय सर
नंबर वन 👍👍👌👌
Vinod Mast….
सगळे लेख सुंदर 👌👌
खुप छान