थोर देशभक्त, यशस्वी आणि दानशूर उद्योगपती म्हणून प्रसिध्द असलेले श्री रतन टाटा यांचा ८५ वा वाढदिवस येत्या २८ डिसेंबर रोजी आहे.
या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई येथील फॅन्सी रिहाबिलिटेशन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेतर्फे युद्धात कायमच्या जायबंदी झालेल्या भारतीय जवानांच्या चेहऱ्यावर काही काळ तरी हसू फुटावे यासाठी मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम बुधवार, २८ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता प्यारापलेजिक
रिहाबिलिटेशन सेंटर, पार्क रोड, खडकी, पुणे – येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपरोक्त सेंटरचे साहाय्य लाभले असून नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अल्प परिचय
आपली बहीण फॅन्सी हीचे तरुण वयात झालेले अपघाती निधन पाहून कस्टम अधिकारी असलेल्या एस ए राजन यांचे हृदय द्रवले आणि त्यांनी कस्टम च्या सेवेतून मुदतपूर्व सेवा निवृत्ती घेऊन आपले उर्वरित आयुष्य लोक कल्याणासाठी वेचण्याचे ठरविले.
दिव्यांग व्यक्तींना सहाय्याची अधिकाधिक गरज असते, हे पाहून त्यांनी दिवंगत बहिणीच्या नावे ३५ वर्षांपूर्वी ट्रस्ट स्थापन केला आणि तेव्हा पासून ते हर प्रकारे दिव्यांग बंधू भगिनींची सेवा करीत आहेत. आता पर्यंत त्यांनी जवळपास ५०० हून अधिक दिव्यांगाना स्वावलंबी होण्यास मदत केली आहे.
या ट्रस्टला श्री रतन टाटा यांनी देणगी म्हणून ७ लाख रुपये दिले. त्या निधीतून ट्रस्ट ने बेकरी उत्पादने तयार करून ती विकण्याचेही काम हाती घेतले आहे. श्री रतन टाटा यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांचा ८५ वा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा करण्याचे ट्रस्ट ने यंदा ठरविले आहे.
सामाजिक कार्य करताना अनेक अडचणी येत असल्या तरी न थांबता यापुढेही आपले कार्य अधिक जोमाने करण्याचा श्री राजन यांचा निर्धार आहे.
– टीम एनएसटी 9869484800
माननीय महोदय रतन टाटा यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन त्यांना पुढील वर्षात उत्तम आरोग्य आणि मानसिक समाधान लाभो.
All the best Rajan sir!
क्या बात है…
बहुत खूब…
राजन साहेब यांना सलाम…!!