रम्य ते बालपण
चिरंतन आठवण
ना कसले टेंशन
आठवणींचे पेंशन
गोंधळ मज्जा मस्ती
नाही निंदा नालस्ती
ना इश्यू स्टेटसचा
ना लोचा इमेजचा
विनाशुल्क आनंद निखळ
कट्ट्यावरचा हास्यकल्लोळ
ना वेळेचे नियोजन
ना खेळाचे आयोजन
दिवसभर खेळा
मित्रांचा मेळा
मोठे होण्याची घाई तेव्हा
आता वाटते लहानपण देगा देवा

– रचना : सौ सीमा कोळपकर
रम्य ते बालपण खरंच खुप छान व मनाला भावते अशी कविता 👌👌सीमा खरंच छान.
अश्याच छान सोप्या शब्दातीत कविता वाचन हेच NewsStoryToday चे खास वैशिष्ट्य आहे. 👌👍