सौ रश्मी हेडे लिखित व न्युज स्टोरी टुडेच्या प्रकाशिका सौ अलकाताई भुजबळ प्रकाशित, माननीय देवेंद्र भुजबळ संपादित
‘समाजभूषण २’ या अतिशय प्रेरणादायी व प्रबोधनात्मक पुस्तकाबद्दल सौ रश्मी हेडे यांना मुंबई येथील सर्वद फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पुरस्कार वितरण समारंभ उद्या, शनिवारी सकाळी दहा वाजता सातारा येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ रणधीर शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक सर्वश्री डॉ संदीप सांगळे, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. समारंभाचे सूत्रसंचालन प्रा डॉ सुचिता पाटील करणार आहेत.
समाजभूषण २
समाजभूषण २ या पुस्तकात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या आणि इतरांना यशस्वी होण्याची प्रेरणा देणाऱ्या समाजातील तळागाळात दडलेल्या रत्नांना शोधून त्यांची माहिती जमा करून उत्तम पध्दतीने मांडणी करून लिहिलेले हे पुस्तकरूपी पुष्प म्हणजे समाजातील युवकांना मार्गदर्शन करणारे आहे.
समाजातील कर्तृत्वान लोकांची या पुस्तकाच्या माध्यमातून ओळख होते. त्यांच्यातील जिद्द , चिकाटी व प्रत्येक संकटावर हिंमतीने केलेली मात भावी पिढीला एक दिशा दाखवणारी आहे. आजच्या युवकांना खरी गरज आहे ती संयमाची, शांततेची, प्रगल्भ विचारसरणीची व उत्तम निर्णय क्षमतेची आणि त्या सर्व गोष्टी या पुस्तकात लोकांच्या संघर्षातून त्यांना समजण्याची मदत होईल.
माझ्यामते हे पुस्तक म्हणजे आजच्या पिढीला घडवण्यासाठी अमृत रूपे पुष्प आहे. या उत्तम कार्यास आपण स्वतःला झोकून देऊन हे पुस्तक निर्माण केल्याचे काम केले. भविष्यात येणारी युवा पिढी या पुस्तक रूपाने आपल्याला सदैव स्मारणात ठेवेल यात शंका नाही.
पुस्तकाची छपाई मुखपृष्ठ उत्तम आहे. आपल्या सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
अल्प परिचय
सौ रश्मी हेडे गेली १० वर्षे विविध विषयांवर लेखन करीत आहेत. विशेषतः कोरोनाच्या काळात सर्व कामकाज ठप्प झाल्याने त्यांचे सतत जागृती पर, प्रेरणादायी लिखाण विविध वृत्तपत्रे, वेबपोर्टलवर,दिवाळी अंकात तसेच व्हॉट अँप व फेसबुक च्या माध्यमातून प्रकाशित झाले आहे. असे जवळपास १५० लेख लिहिले आहेत. या लिखाणाबद्दल आतापर्यंत त्यांना सत्यवादी ह्यूमन राईट्स, मुंबई, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस, नवी दिल्ली, भारतीय महाक्रांती सेना, प्रतिष्ठा फौंडेशन सांगली येथे राज्यस्तरीय स्त्री प्रतिष्ठान सन्मान सोहळा २०२० चा साहित्यका / शिक्षिका पुरस्कार, अखिल भारतीय पत्रकार संघाचा स्वयंसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार (नाशिक), तसेच संजीवन कला विकास समिती (घोडपदेव मुंबई) नवदुर्गा पुरस्कार २०२१, व गुणिजन गौरव लोकसेवा अकादमीचा नारीशक्ती राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषागौरव पुरस्कार (पुणे), तसेच माणुसकी सेवा गौरव पुरस्कार २०२३ अभिनेत्री पल्लवी कदम यांच्या हस्ते नाशिक येथे प्रदान करण्यात आला. अजूनही त्यांचे लेखन सातत्याने सुरू आहे.
सातारा येथे गेल्या १५ वर्षांपासून त्या विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात कार्यरत आहेत. तसेच अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील केले आहे.
सौ रश्मीताई हेडे यांचे साहित्यिक गुरू महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक तसेच आंतराष्ट्रीय वेब पोर्टल, www.newsstorytoday. com चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले, सूचना दिल्या तसेच वेब पोर्टल च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले व एक लेखिका म्हणून समाजात एक वेगळी ओळख निर्माण करू शकल्या ते केवळ त्यांच्या सहकार्यामुळे. तसेच गुरू पत्नी वेब पोर्टलच्या निर्मात्या सौ अलकाताई भुजबळ ज्या नेहमीच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असतात, साथ देतात त्यामुळेच हा लेखिकेच्या प्रवास सुखकर होऊ शकला असे त्यांचे मत आहे.
या पुरस्काराचे श्रेय त्या मा. देवेंद्रजी भुजबळ सर व अलका ताई यांना देऊ इच्छितात कारण त्या दोघांची भक्कम साथ असल्यानेच हे लिखाण पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित होऊ शकले असे त्यांना मनापासून वाटते.
या पुढील लेखनकार्यास आपल्याला टीम न्युज स्टोरी टुडे कडून अनेक शुभेच्छा.
— लेखन : अशोक कुंदप. सातारा ☎️ 9869484800
Congratulations
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉
खुप छान! मनपूर्वक अभिनंदन…अनेक शुभेच्छां.
खूप छान. हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐👏👏👏