रस्त्यावर राहणारी, गोरगरीब, मोजमजुरी करणारी मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजेत. यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन सुंदर होत नाही म्हणून शिक्षण घेऊन प्रत्येकाने आपल्या उत्कर्षाच्या वाटा शोधल्या पाहिजेत, असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक रामराव पवार यांनी केले.
चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या चेंबूर नाईट हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी संस्थेच्या शालेय समिती अध्यक्ष भुषणा चंद्रशेखर पाठारे,प्रमुख पाहुणे अनिल नोरनारे, मार्गदर्शक शशिकांत गवस उपस्थित होते.
प्रधान कार्यवाहक जितेंद्र हरिराज म्हात्रे, आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कोषाधिकारी चेतन विजय कोरगावकर, कार्यकारी सदस्य विष्णु गणपत कांबळे, चंद्रकांत गणपत ठाकूर, चंद्रशेखर सुरेंद्रनाथ पाठारे यांच्या हस्ते गुणवान विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा कांबळे यांनी केले. तर चेंबूर नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष धावडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— लेखन : अनंत धनासरे, मुंबई.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Ham Logon computer English bhi sikhana
अतिशय सुंदर कार्यक्रम