Thursday, July 3, 2025
Homeसाहित्यराख अस्तित्वाची

राख अस्तित्वाची

अंतस्थ पेटलेला वणवा..
खुणावतो… बोलावतो मला
मी नाकारते निमंत्रण कैक वेळा
पण ती धग… ती धग जाणवते
होरपळून टाकते जिवाला…!

जगण्याच्या व्यथावेदेनेतुन भडकतात
अपयश, निराशेच्या ज्वाला
सैरभैर झालेला विचारांचा वारा
देतो गती त्या निखाऱ्याला
मग सहजच लागते आग …
आत्मविश्वासाच्या काष्टवत झाडाला….!

उडतात ठिणग्या…धूर व्यापतो दूरस्थ नभाला
व्याकुळ होते मी.., मदतीसाठी किंचाळते…
पण तो आर्त स्वर ऐकत नाही कुणीच
मी धावते वेगानं …दुरवर शोधते झरा..
झरा शितल नात्यांचा, आपुलकीचा
मग धुसर वाटेत दिसतो डोह..
डोह केवळ बनावटी, फसव्या पाण्याचा…
उपहास, ईर्षा, द्वेषाच्या मगरी
अन् खोट्या सहानुभूतीचे मासे असलेल्या
डोहात बुडून जलसमाधी घेण्यापेक्षा
मी फिरते मागे पुन्हा…आत्मदाहासाठी..
अन् देते स्वआहुती…त्या वणव्यात….!

दगड झालेलं मन..
अन् मातीचा देह सोडून ..
जळत सारं हळूहळू …होते होळी संवेदनांची
मागे उरतो फक्त.. कोळसा स्मृती चिन्हांचा..
अन् उडते राख.. राख अस्तित्वाची….!

काव्य नीता

– रचना✍️काव्य नीता, जम्मू काश्मीर

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments