राग भिन्न-षड्ज किंवा राग कौशिक ध्वनी
भिन्न-षड्ज हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा राग आहे. हा राग कर्नाटक संगीतातील मेलाकर्ता क्र. 29 धीराशंकरभरणम शी संबंधित आहे.
भिन्न-षड्ज हा प्राचीन राग सध्या कौशिक-ध्वनी म्हणून ओळखला जातो. जरी त्याचा वादी स्वर मध्यम असला तरी त्याचे बाकीचे स्वर तितकेच महत्त्वाचे आहेत ज्यावर त्याला विराम दिला जाऊ शकतो. या कारणास्तव, या रागाला विस्ताराचे पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि ते तिन्ही सप्तकात सहजपणे गायले जाऊ शकते.
गमक आणि मींडचा वापर रागाच्या सुशोभिकरणास मदत करतो. अवरोहमध्ये, मींडमध्ये सा’ नि ध घेण्यापेक्षा सा’ ध अधिक मधुर वाटते. या रागाचे स्वरूप शांत आणि गंभीर आहे.
राग भिन्न-षड्ज हा औडव बिलावल, भूकोश, दिनका मालकोश, कौशिकध्वनी आणि कौसीधानी अशा अनेक पर्यायी नावांनी ओळखला जातो.
थाट : बिलावल
रात्रीचा दुसरा प्रहार 9 ते 12
भिन्न-षड्जमधील हिंदी आणि मराठी गाणी
1) उड़ जा रे कागा
2) जयदेव जय शिवराय
3) सगुण संपन्न
4) तुम बिन जीवन कैसा जीवन
5) बलमा अनाड़ी, मन भाए
६) अच्छा ही हुआ दिल टूट गया

– संकलक : प्रिया मोडक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800