राग आसावरी
राग आसावरी हा एक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील राग आहे. राग आसावरी हा आसावरी थाटमधील मूलभूत राग मानला जातो. दक्षिण भारतीय संगीत योजनेत, आसावरी थाटला नटभैरवी मेळा म्हणून ओळखले जाते.
भातखंडे पूर्वकाळामध्ये आसावरी शुद्ध ऋषभ ऐवजी कोमल ऋषभ वापरत असत. जेव्हा भातखंडेजींनी थाट प्रक्रिया तयार केली तेव्हा त्यांनी आसावरीचा कोमल ऋषभ बदलून शुध्द ऋषभ केला पण नाव तेच राहिले. तेव्हापासून जुन्या किंवा खर्या ‘आसावरी’ला कोमल ऋषभ आसावरी म्हणतात आणि नवीन शुद्ध ऋषभ आसावरीला फक्त ‘आसावरी’ म्हणतात.
राग आसावरी आणि कोमल ऋषभ आसावरी हे राग उत्तर भारतातील शीख परंपरेत देखील आढळतात आणि ते श्री गुरु ग्रंथ साहिब नावाच्या शीख पवित्र ग्रंथाचा भाग आहेत. शीख गुरु श्रीगुरु रामदास जी आणि श्रीगुरु अर्जुन देव यांनी या रागांचा वापर केला. कोमल ऋषभ आसावरी हा राग श्री गुरु ग्रंथ साहिब जी मध्ये ‘राग आसावरी सुधंग’ म्हणून राग ओळखला जातो.
आसावरी आणि त्यासमान जौनपुरी आणि देव गंधार हे राग सकाळचे आहेत.
आधुनिक आसावरीने जौनपुरीला लोकप्रियता दिली. विशेष म्हणजे, शुद्ध ‘रे’ आसावरी वरून जौनपुरीकडे लोकांची पसंती स्थलांतरित केल्याने, कोमल ‘रे’ आसावरीने एकप्रकारे पुनरागमन केले आहे. फक्त आसावरी असे लेबल केलेले बहुतेक रेकॉर्डिंग कोमल ‘रे’ आसावरी मधील आहेत. देव गंधार देखील कोमलच्या व्यतिरिक्त शुध्द ‘ग’ वापरतात. हे तीन राग अगदी सारखेच वाटतात आणि पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्यासह संगीतातील काही तज्ञ आसावरी आणि जौनपुरी हे वेगळे राग मानत नाहीत.
राग आसावरी रक्तातील अशुद्धता आणि संबंधित रोग दूर करण्यासाठी प्रभावी आहे.
थाट : आसावरी
मूड : त्याग
वेळ: सकाळी उशिरा (सकाळी 9 ते दुपारी 12)
आसावरी रागावर आधारित अनेक लोकप्रिय चित्रपट गाणी आहेत. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत :
1) मुझे गले से लगा लो बहुत उदास हूँ मैं – चित्रपट – आज और काल
2) जादू तेरी नजर – चित्रपट – डर
3) चले जाना नहीं नैना मिलाके – चित्रपट – बडी बहन
4) तुम जिद तो कर रहे हो – मेहंदी हसन
5) बेरहम आसमान मेरी मंजिल बता है कहां – बहाना
6) न ये चाँद होगा न तारे रहेंगे – चित्रपट – शर्ट
7) झनक झनक तोरी बाजे पायलिया – चित्रपट – मेरे हजूर
8) तूने हाय मेरे ज़ख्म ए जिगर को छू लिया -चित्रपट – नगीना (जुनी)
9) मुझे को आवाज दे तू कहां है, मेहंदी हसन – चित्रपट – घुंगट
10) आँखों में तेरी – चित्रपट – ओम शांती ओम
11) पिया ते कहां गयो नेहरा लगाये-फिल्म – तुफान और दिया
12) अभी मुझमें कहीं – चित्रपट – अग्निपथ
13) दिल दीवाना बिन सजना के – फिल्म – मैने प्यार किया
14) हमे और जीने की चाहत ना होती – चित्रपट – अगर तुम ना होते
15) लो आ गई उनकी याद – चित्रपट – दो बदन
16) सजन रे झूठ मत बोलो – चित्रपट – तीसरी कसम
17) सिलसिला ये चाहत का – चित्रपट – देवदास (2002)
18) सुन साहिबा सुन – चित्रपट – राम तेरी गंगा मैली
आसावरी रागातील मराठी गाणी
1) अवघे गर्जे पंढरपूर
2) तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
3) प्रेमभावे जीव जगी या
4) दूर आर्त सांग कुणी छेडली ‘आसावरी’
5) मी समजुं तरि काय भुले
6) जाई परतोनी, बाळा, जाई परतोनी
क्रमशः

– संकलक : प्रिया मोडक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800