राग सोहनी
सोहनी याला सोहिनी म्हणूनही संबोधले जाते. मारवा मधील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. सोहिनी हा एक रात्रीचा राग आहे, याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे मध्यरात्रीचे सौंदर्य म्हटले जाते. सोहिनी हे रूप मनोहर आहे.
बहार प्रमाणेच हा एक छोटासा राग आहे, ज्यात विस्तारासाठी फारशी जागा नाही. हा राग मारवा थाटचा आहे. सोहनीचा स्वर संच मारवा या रागासारखा आहे. तीव्र, मध्यम आणि शुद्ध निषाद यांच्यातील षडज, मध्यम भाव सबंध प्रेक्षकांवर एक गोड मंत्रमुग्ध करणारा प्रभाव निर्माण करतो. आरोहमध्ये ऋषभ आणि पंचम हे वर्ण आहेत, ऋषभ कोमल, मध्यम तीव्र हे सोहनीमध्ये स्वर आहेत. बाकी सर्व स्वर हे शुद्ध स्वर आहेत. हमसाध्वनी हा कर्नाटक संगीतातील सोहोनी सारखा राग आहे.
राग सोहोनी हा एक उत्तररंग प्रधान राग आहे – जो प्रामुख्याने अष्टकाच्या उच्च श्रेणीमध्ये विकसित केला जातो. हा राग मधल्या सप्तकात गायला गेल्यास तर पूरिया राग दिसू लागतो आणि मधल्या सप्तकात ऋषभ आणि धैवत गायला गेल्यास मारवा राग दिसू लागतो.
अनेक उत्तररंग प्रधान रागांप्रमाणेच रागाचे चलन किंवा हालचाल वेगवान आणि चपखल असते. हा राग औडव-षाडव स्वरूपाचा आहे. या रागाचा मूड आकर्षक आणि विलासी आहे आणि प्रकृती चंचल आहे.
थाट : मारवा
वेळ : रात्रीचा चौथा प्रहर (सकाळी 3 ते 6), संधि-प्रकाश राग
राग सोहिनीवर आधारित हिंदी गाणी :
1) झूमती चली हवा याद आ गया कोई – संगीत सम्राट तानसेन
2) जीवन ज्योत जले- ग्रहस्थी
3) कान्हा रे कान्हा – ट्रक चालक
4) कुहु कुहु बोले कोयलिया – सुवर्णा सुंदरी
५) प्रेम जोगन बन के – मोगल-ए-आझम
6) पायल झम झम बाजे – बसंत
राग सोहिनीवर आधारित मराठी गाणी :
1) जिवलगा कधि रे येशील तू
2) नंदनवन फुलले
3) सख्या रे सख्या रे घायाळ मी हरीणी
4) तळमळ अति अंतरात

– संकलक : प्रिया मोडक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
