Home कला राग सुरभी : निरोप…..

राग सुरभी : निरोप…..

0

मनःपूर्वक आभार – न्यूज स्टोरी टुडे !
गेले जवळ-जवळ वर्षभर आपण न्यूज स्टोरी टुडे मध्ये आम्ही लिहिलेले शास्त्रीय रागांविषयीचे लेख छापले, त्यासाठी आपले मीटकलाकार तर्फे मनःपूर्वक आभार !!!!

आमच्या बरोबर मागच्या वर्षीच्या मार्च महिन्यातील कर्नाटक ट्रीपला अचानकपणे देवेंद्र भुजबळ आणि सौ अलका भुजबळ या दांपत्याशी आमची भेट झाली ! अतिशय उत्साही अलकाताई आणि चतुरस्त्र पत्रकार देवेंद्रजी यांची भेट होणं म्हणजे आमच्यासाठी एक आनंदाची पर्वणी होती !

8 मार्चला कुर्ग येथे महिला दिनानिमित्त खास एक प्रोग्राम त्यांनी घडवून आणला. आम्हाला खूप मजा आली. त्यांच्या कार्याची ओळख आम्हाला झाली. न्यूज स्टोरी टुडे हे ऑनलाइन ई पेपर त्यांनी चालू केला आहे. जवळजवळ 86 पेक्षा जास्त देशांमध्ये तो वाचला जातो.

मी लगेच आमच्या टीमशी बोलले. ऋचा मॅडमच्या कानावर घातलं आणि आम्ही असं ठरवलं की 2022 गुढी पाडव्यापासून दररोज एक लेख आपण देऊया !

मी या संदर्भात देवेंद्रजींशी बोलल्याबरोबर त्यांनी अजिबात आढेवेढे न घेता आमच्या या लेखमालेसाठी संमती दिली. एवढे मोठे पत्रकार असून सुद्धा त्यांनी सहज हो म्हटलं. योग्य वेळी- योग्य तो सल्लाही दिला. हा त्यांचा मोठेपणा आहे, त्यासाठी खूप खूप आभार.

Meetkalakar artipedia मध्ये असलेल्या रागांचा संकलन होतं माझ्यापाशी. ते मराठीत संकलित करून न्यूज स्टोरी टुडे मार्फत प्रसारित करावं असं आम्ही ठरवलं. आणि देवेंद्रजींनी त्याला लगेच दुजोरा दिला आणि आम्हाला फार आनंद झाला. त्यांनी या राग मालेला नवीन नाव सुचवण्यास सांगितलं. आम्ही “राग सुरभी” हे नाव दिलं.

भारत हा एक कलाप्रेमी देश आहे. आपल्याला विविध कलांची मनोहर परंपरा आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हा तर आपल्या सर्वात बहुमूल्य खजिना आहे ! काळाप्रमाणे या संगीताची जाण समाजामध्ये कमी होत चालली आहे. परंतु आजही अनेक उत्तम उत्तम कलाकार या क्षेत्रात कार्यरत आहेत. या कलाकारांना आणि त्यांच्या कलेला लोकांपर्यंत पोहोचवणं ही मीटकलाकार ची प्रेरणा आहे !

आज वर्षभर आम्ही 40 च्या वरती लेख – राग सुरभी या नावाने या न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टल च्या मार्फत दिलेले आहेत. या आमच्या 40 च्या वर सचित्र रागांचे लेख वाचून जर कोणाला शास्त्रीय संगीत शिकावंसं वाटलं, याचा अभ्यास करायची इच्छा झाली तर या सगळ्या लेखनाची आणि संकलनाची मेहनत कामी आली असा आम्हाला नक्कीच वाटेल. आमची साथ दिल्याबद्दल न्यूज स्टोरी टुडे ला धन्यवाद द्यावे तितके कमीच ! यापुढेही आपले सहकार्य आम्हाला लाभेल अशी आशा आहे. भारतीय कला वृद्धिंगत होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मीटकलाकारच्या संस्थापिका ऋचा राज्याध्यक्ष, मीटकलाकाराच्या सीनियर मेंबर उज्वला आठवले तसेच मीटकलाकार मधील सहकारी श्रद्धा जोशी आणि प्राची महाडिक आणि मी संकलन व लेखन करणारी प्रिया मोडक, आम्हा मीटकलाकार टीमतर्फे देवेंद्रजी आणि अलकाताई यांचे खूप खूप धन्यवाद !!!!

देवेंद्रजी, अलकाताईं आणि न्यूज स्टोरी टुडे ला पुढच्या वाटचालीसाठी मीटकलाकार तर्फे खूप खूप शुभेच्छा !

प्रिया मोडक

– लेखन : प्रिया मोडक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version