बडोदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सहकारी मंडळी संस्थेतर्फे श्रीमंत राजे लखूजीराव जाधवराव (‘राजमाता जिजाऊमाँसाहेब यांचे वडील ) यांचे १६ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांचा काल “राष्ट्रमाता जिजाऊ” पुरस्काराने गौरव करण्यात आला. तंजावरचे महाराजा बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमांस प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साथीने हिंदवी स्वराज्यासाठी योगदान दिलेल्या सरदारांच्या वंशजांना संस्थेतर्फे नुकतेच गौरविण्यात आले. प्रारंभी संस्थेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर उघड्या जीपमधून वंशजांची ढोल-ताशांच्या ठेक्यात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या मिरवणुकीत युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके सादर झाली.
यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते, रामचंद्र आमत्य पंत, प्रतापराव गुजर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, बहिर्जी नाईक, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, नाईक-निंबाळकर, रायाजी बांदल, हिरोजी इंदुलकर यांच्या वंशजांचा सत्कार झाला. यावेळी कॅबिनेट मंत्री राजेंद्र त्रिवेदी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष गौरव पवळे यांनी आयोजन केले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800