Sunday, July 6, 2025
Homeबातम्याराज्यपालांच्या हस्ते अनुराधा पौडवाल सन्मानित

राज्यपालांच्या हस्ते अनुराधा पौडवाल सन्मानित

अनुराधा पौडवाल या प्रामुख्याने लोकप्रिय गायिका म्हणून जरी ओळखल्या जातात तरी वेळोवेळी त्या विविध प्रकारचे सामाजिक कार्य त्यांच्या सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून करीत असतात.

एचआयव्ही बाधित मुलांसाठी अनुराधा पौडवाल करीत असलेल्या कार्याबद्दल नुकताच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

लातूर येथील ‘सेवालय बालगृह संस्थेने’ एचआयव्ही बाधित मुलांसाठी बांधलेल्या वसतिगृह इमारतीच्या कोनशिलेचे प्रातिनिधिक अनावरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात करण्यात आले. यावेळी सूर्योदय फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा पौडवाल, एम्पथी फाउंडेशनचे विश्वस्त रमेश दमाणी व प्रवीण छेडा, ‘सेवालय‘चे संस्थापक रवी बापुटले उपस्थित होतै.

ईश्वराने दीनदु:खी‌ व उपेक्षित लोकांची सेवा करण्याची क्षमता केवळ मनुष्याला दिली आहे.‌ निराश्रित व्यक्तींची सेवा करून तिला सन्मानाने जीवन जगण्यास मदत करण्याचा विशेषाधिकार मनुष्याला मिळाला आहे.‌ त्याचा वापर करुन प्रत्येकाने किमान एक गरजू व्यक्तीला तरी जीवनात मदत केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. या दृष्टीने एचआयव्ही बाधित मुलांसाठी पाश्वगायिका अनुराधा पौडवाल करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्रगार  राज्यपालांनी काढले.

सेवालय संस्थेच्या ‘हॅपी इंडियन‌ व्हिलेज‘ (एचआयव्ही) या उपक्रमाचे‌ कौतुक करुन राज्यपालांनी संस्थेला दहा लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

यावेळी एचआयव्ही बाधित मुलांनी सादर केलेले सीमेवरील जवानांचा जीवनपट दाखविणारे लघुनाट्य पाहून राज्यपालांसह सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले.

सूर्योदय फाउंडेशन तसेच एम्पथी फाउंडेशन ‌या संस्थांच्या आर्थिक सहकार्याने सेवालय बालगृहाच्या वसतिगृहाच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.

शोभा पौडवालI

– लेखन : शोभा पौडवाल
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments