हुंडाविरोधी चळवळ, मुंबई या सामाजिक संस्थेच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने महाराष्ट्रातील प्रौढांसाठी (१८ वर्षावरील व्यक्ती) खुली निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे विषय आहेत : (१) लॉकडाउन काळातील समाजाची मानसिकता आणि त्याचे स्त्री जीवनावरील परिणाम.
(२) लॉकडाउन काळातील अनुभवलेली माणुसकी : स्वानुभव. (३) लॉकडाऊन काळातील व्यापार व अर्थकारण यांची बदललेली समीकरणे.
निबंधाची कमाल शब्दमर्यादा (१२००) बाराशे शब्द असून, निबंध फक्त मराठी भाषेत लिहिता येईल. निबंध फुलस्कॅप अथवा ए-४ आकाराच्या कागदावर एकाच बाजूने सुवाच्च अक्षरात लिखित अथवा टंकलिखित असावा. निबंधाची मूळ प्रत पाठवावी. फोटो प्रत स्वीकारली जाणार नाही. निबंध ईमेलवर स्वीकारला जाणार नाही.
स्पर्धकाने निबंधाला जोडून स्वतःच्या स्वाक्षरीसह स्वतःचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, (पिन कोड सह) वय, व्यवसाय, टेलीफोन नंबर व ई-मेल पाठवावा.
“सदर निबंध यापूर्वी कुठल्याही निबंध स्पर्धेत बक्षीस पात्र ठरलेला नसून निबंध मी स्वतः लिहिलेला आहे” असे प्रमाणपत्र लेखकाच्या स्वाक्षरीसह निबंधाच्या शेवटी देणे अनिवार्य आहे.
बक्षिसे : पहिल्या तीन क्रमांकांच्या विजयी स्पर्धकांना रोख ₹२५००/-, ₹१५००/- आणि ₹१०००/- अशी तीन पारितोषिके आणि पहिल्या १० क्रमांकांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.
सर्वोत्कृष्ट निबंधास “जगन्नाथ परळकर ट्रॉफी” दिली जाईल. स्पर्धेसाठी तज्ञ परीक्षक नियुक्त केले जातील व त्यांचा निकाल सर्वांवर बंधन कारक राहील तसेच या निकालाला कोठेही आव्हान देता येणार नाही.
स्पर्धकांनी आपला निबंध ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत
आशा कुलकर्णी, महासचिव -हुंडाविरोधी चळवळ मुंबई, ४/५० विष्णुप्रसाद ‘बी’ सोसायटी, शहाजीराजे मार्ग, पार्ले बिस्किट फॅक्टरी जवळ, विलेपार्ले (पूर्व) मुंबई ४०००५७ येथे पाठवावा.
संपर्क दूरध्वनी : ०२२-२६८३६८३४
भ्रमणध्वनी : ९८१९३७३५२२ / ९८१९५३९१९३
ई-मेल : antidowry498a@gmail.com
संकेत स्थळ :
www.antidowrymovement.com