Home बातम्या राज्यातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना दिलासा

राज्यातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना दिलासा

0

राज्यातील पत्रकार, माध्यम प्रतिनिधी, यांना देण्यात येणाऱ्या अधिस्वीकृती पत्रिकेचं ३१ मार्च पर्यंत नूतनीकरण आवश्यक असते. तथापि राज्यात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन सुरू असल्यामुळे प्रत्यक्ष हे नूतनीकरण शक्य होत नसल्याने यापूर्वी ३१ जुलै पर्यंत त्या वैध समजण्यात येतील,असे माहिती व जनसंपर्क महासंचालनाल,याने कळविले होते. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही मुदत आता ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे ,असे महासंचालनालयाने दिनांक २७ जुलै २०२० रोजीच्या परिपत्रकाद्वारे कळविले आहे. राज्यात सध्या जवळपास ३ हजारहून अधिक अधिस्वीकृती धारक आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version