रात्र नवी कोरी
नव्या नवतीची
तिच्या पदरात
चांदण्याची ज्योती
रात्र काजळीची
कोरीव कातीव
तिच्या स्पंदनात
धुंद आर्त रव
तिच्या अधरात
दाटलेले गूज
आणि काळजात
रोखलेली वीज.
लपे अंतरात
ही चांदणमाया
उभी अधोमुख
अबोल ही काया.
— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800