Wednesday, December 31, 2025
Homeबातम्या"रापा" : 2025 चे पुरस्कार प्रदान

“रापा” : 2025 चे पुरस्कार प्रदान

“रेडिओ अ‍ॅडव्हर्टायझिंग प्रॅक्टिसेस असोसिएशन ऑफ इंडिया” अर्थात रापा चे 2025 चे पुरस्कार, नुकतेच एका  शानदार समारंभात प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ निर्माते – दिग्दर्शक, श्री किरण शांताराम आणि  चित्रपट तंत्र अधिकारी श्री उज्ज्वल निरगुडकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री किरण शांताराम यांनी चित्रपती व्ही शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त रापा तर्फे देण्यात येणारे ‍ जीवन गौरव पुरस्कार, व्ही शांताराम यांच्या नावाने देण्यात येतील, अशी घोषणा केली.

तर श्री उज्ज्वल निरगुडकर, म्हणाले की, भारत सरकारने 1913 पासून निर्माण झालेल्या अभिजात चित्रपटांच्या जतनाचा 600 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला असून, भावी पिढ्यांसाठी हा मोठा ठेवा असेल.

प्रारंभी रापा चे प्रमुख श्री रत्नाकर तारदाळकर यांनी रापा च्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला.

श्री रत्नाकर तारदाळकर

2025 चे पुरस्कार पुढील प्रमाणे आहेत :
जीवन गौरव पुरस्कार :
1. श्री ब्रिज मोहन ; 2. श्रीमती सरिता सेठी

रेडिओ जाहिरात – लिंगो इंडिया प्रा. लि.

रेडिओ जिंगल
ऑल इंडिया रेडिओ – दिनेश अडवदकर

सार्वजनिक सेवा कार्यक्रम
ऑल इंडिया रेडिओ – नेहा खरे.

वर्षातील सर्वोत्कृष्ट रेडिओ जॉकी
रेडिओसिटी – आरजे गौरव

प्रेरणादायी आणि डायनॅमिक आरजे
रेडिओ नशा – आरजे रोहिणी रामनाथन

अष्टपैलू मीडिया व्यक्तिमत्व – आरजे मलिशका

ओटीटी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म
सर्वोत्कृष्ट ओटीटी वेब सिरीज
द ब्रोकन न्यूज – (झी ५ आणि बीबीसी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
द ब्रोकन न्यूज – विजय वैकुल

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन हाऊस
झी ५, बीबीसी – द ब्रोकन न्यूज

ओटीटी :
सर्वोत्कृष्ट डबिंग कलाकार (पुरुष) – विनोद कुलकर्णी

सर्वोत्कृष्ट डबिंग कलाकार (महिला) – मेघना एरंडे जोशी

टीव्ही श्रेणी :
दूरदर्शन (जाहिरात / स्पॉट)
इंडियन रेल्वे – गणेश दिवेकर

“सार्वजनिक सेवा संदेश” – विजय भिंगार्डे

वर्षातील सर्वोत्कृष्ट मालिका
सीआयडी सेशन २ – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सीआयडी सेशन २ – संतोष शेट्टी / सचिंद्र वत्स

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन हाऊस
सीआयडी सेशन २ –  बनिजय एशिया

सर्वोत्कृष्ट मनोरंजन वाहिनी
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन

यूट्यूब चॅनल :
सर्वोत्कृष्ट मनोरंजन वाहिनी
शांती दर्शन चॅनल – एमआयटी पुणे

सर्वोत्कृष्ट मनोरंजन वाहिनी (मराठी)
फुलराणी प्रॉडक्शन्स – दीपक शेंडगे

सर्वोत्कृष्ट शैक्षणिक वाहिनी
फक्त ५ मिनिटे – अनुराधा राजाध्यक्ष

सर्वोत्कृष्ट बातम्यांची वाहिनी
दूरदर्शन सह्याद्री मुंबई – पालखी शर्मा
हा पुरस्कार वृत्त विभागाचे निर्माते श्री आझम मणियार यांनी स्विकारला.

सर्वोत्कृष्ट न्यूज पोर्टल
न्यूज स्टोरी टुडे – अलका भुजबळ

थोडक्यात  “रापा” :
आकाशवाणीने 1967 सालापासून व्यापारी सेवा सुरुवात केल्या. त्यामुळे रेडिओच्या क्षेत्रातील व्यावसायिकांनी या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी “रापा” अर्थात “रेडिओ अ‍ॅडव्हर्टायझिंग प्रॅक्टिसेस असोसिएशन ऑफ इंडिया” ही संघटना स्थापन केली. पुढे 1974 साली दूरदर्शनने देखील व्यापारी सेवा सुरू केल्या. म्हणुन 1977 साली रेडिओ आणि दूरदर्शन उद्योगातील क्षेत्रातील व्यावसायिकांनी  एकत्र येऊन आणि पूर्वीच्या संघटनेचे नाव आणि  स्वरुप बदलून ते “रेडिओ अँड टेलिव्हिजन अ‍ॅडव्हर्टायझिंग प्रोफेशनलस असोसिएशन ऑफ इंडिया” असे केले.

“रापा” पुरस्कार हे रेडिओ, टीव्ही, चित्रपट आणि आता समाज माध्यमांमध्ये अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात. त्यामुळे कुठला पुरस्कार, कुणाला जाहीर होणार आहे, याकडे या क्षेत्रातील व्यक्ती लक्ष ठेवून  असतात.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”