Sunday, March 16, 2025
Homeलेखरायगड जिल्हा पर्यटन

रायगड जिल्हा पर्यटन

नमस्कार मंडळी.
रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, भा.प्र.से. यांच्या वतीने “समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण” या कॉफी टेबल बुकची डिजिटल प्रत (ई-फ्लिपिंग बुक) खास आपणासाठी पाठवित आहे.

रायगड जिल्ह्यातील प्राचीन लेणी, गड किल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे, गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे अशा पर्यटनस्थळांसोबतच उद्योग, कारखाने, स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजना, पर्यटकांसाठी मार्गदर्शक नकाशे, अशा उपयुक्त माहितीचे संकलन असलेल्या जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण” या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत तसेच राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, रायगड जिल्हाधिकारी तथा प्रभारी कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतेच झाले.

तर राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “समग्र रायगड” या कॉफी टेबल बुकच्या ई-बुक चे अनावरण दि. 31 ऑक्टोबर रोजी संपन्न झाले.

आपल्या अवलोकनार्थ या पुस्तिकेची डिजिटल प्रत (ई-फ्लिपिंग बुक) पुढे देत आहे.
ई-फ्लिपिंग बुक : https://raigad.gov.in/samagraraigad/
या ई-फ्लिपिंग बुकचे अवलोकन केल्यानंतर , आपली प्रतिक्रिया रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (collectorraigad@gmail.com) तसेच रायगड जिल्हा माहिती कार्यालयाच्या -:
(dioraigad@gmail.com)
या ईमेल वर पाठवावी, ही विनंती.

– लेखन : मनोज सानप.
जिल्हा माहिती अधिकारी. रायगड-अलिबाग
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments